शिवजयंतीनिमित्त तरडे येथे वृक्षलागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:33 IST2021-02-20T04:33:43+5:302021-02-20T04:33:43+5:30
स्वच्छ सुंदर व हरित महाराष्ट्र ही संकल्पना ग्रीन फाउंडेशनकडून राबविण्यात आली. ...

शिवजयंतीनिमित्त तरडे येथे वृक्षलागवड
स्वच्छ सुंदर व हरित महाराष्ट्र ही संकल्पना ग्रीन फाउंडेशनकडून राबविण्यात आली. महाराष्ट्र राज्यातील २७ जिल्ह्यांत ग्रीन फाउंडेशन कार्यरत आहे. विविध ठिकाणी पर्यावरणपूरक कार्यक्रम हाती घेतले जात असून ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम व वृक्षरोपण करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तरडे गाव येथील पीरसाहेब मंदिर येथे बारा फुटी वृक्ष लागवड हेमंत खेडेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. परिसरामध्ये देशी झाडांची लागवड करण्यात आली.
यावेळी ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांचेसमवेत नीलेश खोले, जीवन जाधव, बिरदेव भास्कर, किरण बाचकर, राहुल कुंभार, अमित कुंभार, दत्ता शेंडगे, किरण भोसले, समाधान गायकवाड, निरक बिका, अभिषेक शेंडगे, किरण मगर, जयेश पवार, निखिल चव्हाण, तेजस कुंभार, कृष्णा देठे, ऋतुराज मुळे तसेच कुंजीरवाडी ग्रामस्थ, तरडेगाव उपस्थित होते.