नगरमहामार्गावर वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:20 IST2021-02-21T04:20:30+5:302021-02-21T04:20:30+5:30
पुणे - नगर महामार्गावर वृक्षारोपण करण्यात आले. खांदवे नगर येथील वाघेश्वर पार्किंगचे विजय गायकवाड युवा मंच यांच्या वतीने सामाजिक ...

नगरमहामार्गावर वृक्षारोपण
पुणे - नगर महामार्गावर वृक्षारोपण करण्यात आले. खांदवे नगर येथील वाघेश्वर पार्किंगचे विजय गायकवाड युवा मंच यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत संतुलन संस्थेतील गरीब विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अन्नदानाचे वाटप करण्यात आले तर तरुणांनी वाघोली येथील अनाथ आश्रम शाळेत सामाजिक उपक्रम राबविले.
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके यांच्या वतीने शांती पार्क सोसायटी येथे कोरोनाच्या सावटामुळे साध्या पद्धतीने राजेंची जयंती साजरी केली.छत्रपती शिवरायांचे विचार हे पुस्तकात न ठेवता आपल्या जीवनात आत्मसात केले पाहिजे असे यावेळी बोलताना कटके यांनी सांगितले.या प्रसंगी शिवसेनेचे पुणे पुणे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर कटके,सुभाष कदम,राकेश पवार,राजेंद्र सातव,गणेश गोगावले, शरद सुकाळे,रामचंद्र ठुबे, मंगेश काटे, प्रकाश सावंत,हरेश्वर सिह,इतर मावळे उपस्थित होते.