पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्षारोपण मोहीम महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:07 IST2021-06-23T04:07:55+5:302021-06-23T04:07:55+5:30
कडूस : जंगलाच्या कमतरतेमुळे पावसाचे प्रमाण कमी होत आहे. कोरोनासारख्या ...

पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्षारोपण मोहीम महत्त्वाची
कडूस : जंगलाच्या कमतरतेमुळे पावसाचे प्रमाण कमी होत आहे. कोरोनासारख्या आजारात पुरेशा ऑक्सिजनच्या अभावी झालेली जीवितहानी सर्वांच्या लक्षात आहे. याकरिता निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी कुटुंब स्तरापासून गावपातळीपर्यंत वृक्षारोपण मोहीम राबविण्यात यावी असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांनी केले.
खेड तालुक्यातील पश्चिमेकडील कडूस गावात श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने मंदिर परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. केवळ वृक्षारोपण न करता त्याचे संवर्धन करण्यासाठी विविध संस्था व ग्रामस्थांनी सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे पानसरे यांनी सुचविले.
या वेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्षा कांचन ढमाले, कडूस गावचे सरपंच निवृत्ती नेहेरे, उपसरपंच कैलास मुसळे, सुजाता पचपिंड, ॲड. मनीषा टाकळकर, जि. प. सदस्य अशोक शेंडे, सभापती किसनराव नेहेरे, कांचन उद्योग व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रताप ढमाले, चेअरमन पंडित मोढवे, ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय ढमाले, तात्या धायबर, चांगदेव ढमाले, अभि शेंडे, ज्ञानेश्वर तुपे, दिलीप ढमाले ग्रामपंचायत सदस्य गणेश मंडलिक, अरूण शिंदे, लता ढमाले, हेमलता खळदकर, विजया नाईक, सुधा पानमंद, शेहनाज तुरूक, बारकु गायकवाड, अनिल जाधव, सुरेखा कड, भावना शेंडे, अमोल धायबर, मारुती जाधव, शिवाजी बंदावणे, हनिफ मोमीन, प्रताप गारगोटे, बबलू तुरूक, बाळासाहेब गुरव, शशिकिरण कालेकर, कुंडलिक तुपे, कुमार ढमाले, चंद्रकांत लोहार, वृंदावन महाजन आदी उपस्थित होते.
उपसरपंच कैलास मुसळे यांनी सूत्रसंचलन आणि आभारप्रदर्शन अभिजित शेंडे यांनी केले .
--
फोटो क्रमांक : २२कडूस वृक्षारोपण
सोबत फोटो-- कडूसला पुणे जि. परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई पानसरे व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.