गिरिभ्रमण संस्थेच्यावतीने वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:08 IST2021-07-05T04:08:12+5:302021-07-05T04:08:12+5:30

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे आणि ॲड. मनीषा टाकळकर यांच्या हस्ते ढुम्या डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले. राजगुरूनगर शहराजवळ ...

Tree planting on behalf of the mountaineering organization | गिरिभ्रमण संस्थेच्यावतीने वृक्षारोपण

गिरिभ्रमण संस्थेच्यावतीने वृक्षारोपण

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे आणि ॲड. मनीषा टाकळकर यांच्या हस्ते ढुम्या डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले.

राजगुरूनगर शहराजवळ ढुम्या डोंगर नावाचा प्रसिद्ध डोंगर आहे. येथील गिरिभ्रमण संस्थेच्या सदस्यांचा वाढदिवस नेहमी वृक्षारोपण करून साजरा करण्यात येतो. यावेळी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक बाळासाहेब सांडभोर, अजित डोळस, बाळासाहेब जाधव, प्रवीण दोंदेकर, खळदकर बंधू, सोपान राक्षे, गिलबिले, नामदेव चव्हाण ॲड. रामचंद्र घोलप, सुरेश कातळे सुधाकर जाधव, रोहिदास होले, मारुती घुमटकर आदी उपस्थित होते. यावेळी डोंगरावर पिंपळ, चिंच, करंज, वड अशा स्वदेशी झाडांचे रोपण केले.

०४ राजगुरुनगर

राजगुरूनगर येथे ढुम्या डोंगरावर वृक्षारोपण करताना निर्मला पानसरे व इतर.

Web Title: Tree planting on behalf of the mountaineering organization