निमोणेत अवकाळी पावसाने उडाली त्रेधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:12 IST2021-04-11T04:12:14+5:302021-04-11T04:12:14+5:30
निमोणेसह परिसरातील करडे, लंघेवाडी, चव्हाणवाडी, मोटेवाडी, शिंदोडी, गुनाट, आदी भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. यावेळी सोसाट्याचा वादळी वारा, विजांचा कडकडाट ...

निमोणेत अवकाळी पावसाने उडाली त्रेधा
निमोणेसह परिसरातील करडे, लंघेवाडी, चव्हाणवाडी, मोटेवाडी, शिंदोडी, गुनाट, आदी भागांमध्ये जोरदार पाऊस झाला.
यावेळी सोसाट्याचा वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाच्या सरी यामुळे परिसरातील वातावरण काही काळ भयभीत झाले होते. जोरदार पावसाच्या सरींनी अनेक ठिकाणचे सखल भाग जलमय झाले. उभा ऊस आणि चारा पिके भुईसपाट झाली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे या पावसाने मोठे नुसकान झाले. सध्या रब्बी हंगामातील कांदा काढण्याचे काम चालू आहे बहुतांशी शेतकऱ्यांचा तयार माल शेतातच पडून आहे. अशातच आज अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे कांदा झाकून ठेवता ना शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. शेतकऱ्यांचा कांदा भिजून नुकसान झाले .अगोदरच बाजार भाव नाही आणि त्यात आता अवकाळी पावसाने तयार माल भिजल्यामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे.
--
१० निमोणे : पाऊस