शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

साध्या बसच्या दरात एसीचा प्रवास - सिद्धार्थ शिरोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 04:12 IST

वर्षभरात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात ५०० इलेक्ट्रिक वातानुकूलित (एसी) बस दाखल होणार आहेत. या बस एसी असल्या, तरी तिकिटाचे दर साध्या बसप्रमाणेच असतील. त्यामुळे प्रवाशांना त्यात दरात एसी बसचा प्रवास करता येणार असल्याची माहिती पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

पुणे - वर्षभरात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात ५०० इलेक्ट्रिक वातानुकूलित (एसी) बस दाखल होणार आहेत. या बस एसी असल्या, तरी तिकिटाचे दर साध्या बसप्रमाणेच असतील. त्यामुळे प्रवाशांना त्यात दरात एसी बसचा प्रवास करता येणार असल्याची माहिती पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली. तसेच, पुढील चार वर्षांत प्रवासीसंख्या २० लाखांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही शिरोळे यांनी सांगितले.पीएमपीचे संचालक म्हणून वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शिरोळे यांनी मागील वर्षभरातील कामे तसेचनवीन योजनांबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांनी ५०० वातानुकूलित ई-बसना मान्यता दिली आहे. या बसच्या निविदा प्रक्रियेबाबतची बैठक दि. ९ मे रोजी होणार आहे.पुढील २ महिन्यांतनिविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर दर महिन्याला किमान ५० बस मार्गावर येतील.या बस भाडेतत्त्वावर घेण्याचे नियोजन असून सध्याच्या भाडेतत्त्वावरील बसच्या तुलनेत त्यांचा दर कमी असेल. ई-बससाठी केवळ जागा दिली जाईल.तिथे चार्जिंग पॉर्इंट असतील.पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच स्मार्ट सिटीकडून यासाठी अनुदान मिळू शकते.पायाभूत सुविधाही संबंधित कंपनीच करणार आहे. त्यामुळे पीएमपीला एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. हा खर्च कमी झाल्याने बसचे तिकीट दर साध्या बसप्रमाणेच ठेवले जातील.ई-बसप्रमाणेच ४०० सीएनजी बस घेण्याचेही प्रस्तावित आहे. या बस पीएमपीच खरेदी करणार आहे.दोन्ही बसची निविदा प्रक्रिया एकाच वेळी सुरू केली जाईल. सध्या पीएमपीच्या ताफ्यात २ हजार ९३ बस आहेत. त्यांतील २६० बस जुन्या असल्याने वर्षभरात स्क्रॅप कराव्या लागणार आहेत.तसेच, त्यापुढील वर्षभरात १८० बस स्कॅ्रप करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांत जुन्या ४४० बस कमी होतील.पुढील काही दिवसांत ७० मिडीबस ताफ्यात येतील. त्याच वेळी टप्प्याटप्याने ई व सीएनजीच्या एकूण ९०० बस मिळणार आहेत. त्यामुळे दोन वर्षांत एकूण बसची संख्या किमान अडीच हजार होईल, असे शिरोळे यांनी सांगितले.स्मार्ट सिटीअंतर्गत ई-रिक्षामुंबईतील एकात्मिक वाहतूक प्रकल्पाप्रमाणेच पुण्यातही मेट्रो व पीएमपी यांना जोडण्यात येईल. त्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत किमान एक हजार ई-रिक्षा खरेदी केल्या जाणार आहेत. या रिक्षा पीएमपीमार्फत चालविण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. मेट्रो किंवा पीएमपीमधून उतरल्यानंतर लगेचच या रिक्षा उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे सर्व सार्वजनिक वाहनांसाठी एकच स्मार्ट पास दिला जाईल, अशी माहिती शिरोळे यांनी दिली.४पीएमपीची प्रवासीसंख्या चार वर्षांत २० लाखांवर नेण्याचे उद्दिष्ट, आस्थापना आराखडा लवकरच.४खासदार निधीतून बस स्थानकांच्या नूतनीकरणासाठी ३ कोटी उपलब्ध४दैनंदिन पासचे दर ५० टक्क्यांनी कमी करणार. नव्याने समाविष्ट १४ गावांचा वाहतूक नियोजन आराखडा तयार, पीएमपीची सर्व आगार अत्याधुनिक करणार. बस पार्किंगसाठी बोपोडी येथील जागा निश्चित

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलPuneपुणे