शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

परराज्यात किंवा दुसऱ्या शहरात अडकलेल्यांना प्रवासाची पुणे पोलीस परवानगी देणार; मात्र त्यासाठी....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 17:02 IST

बाहेरगावी अडकलेल्या अनेकांना लॉकडाऊनचा फटका..

ठळक मुद्देअत्यावश्यक सेवेसाठी पुणे पोलिसांकडून शहरातील अंतर्गत प्रवासासाठी डिजिटल पास वितरित बाहेरगावी अडकलेल्या अनेकांना लॉकडाऊनचा फटका

पुणे : कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे.यामुळे संचारबंदी करण्यात आली आहे. सार्वजनिक तसेच खासगी वाहतूक बंद करण्यात आल्याने त्याचा फटका अनेक नागरिकांना बसला आहे. कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या नागरिकांना लॉकडाऊनमुळे अडकून राहावे लागले आहे. कित्येकांना पुन्हा आपआपल्या गावी परतायचे आहे. परंतु पोलिसांनी अटकाव केल्याने ते शक्य होत नसल्याचे दिसून आले आहे. यावर पोलिसांनी आता जे नागरिक परराज्यात अथवा दुसऱ्या शहरात अडकले आहेत त्यांना प्रवासासाठी परवानगी दिली जाणार आहे. मात्र त्यासाठी त्यांनी दिलेले कारण पोलिसांनी योग्य ठरवणे गरजेचे आहे.   पुणे पोलिसांनी आता अति आवश्यक कारणामुळे परराज्यात प्रवास करता येणार आहे. अशी माहिती दिली आहे. यासाठी संबंधित नागरिकांनी covid19mpass@gmail.com या मेल आयडीवर विनंती अर्ज पाठविण्याची सूचना केली आहे. याशिवाय अधिक माहिती मिळवण्यासाठी 022-22021680 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून नागरिकांनी ज्याठिकाणी आहे तिथे राहण्याचे आवाहन केले असताना काही नागरिकांनी अक्षरश: हजारो किलोमीटरचा पायी प्रवास केला आहे. या लॉकडाऊनमुळे त्यांना मोठया समस्येला सामोरे जावे लागले आहे. आता पोलिसानी मेल आयडी आणि दूरध्वनी क्रमांक दिल्याने त्यांना थोडा फार दिलासा मिळणार आहे. पुणे पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्यांना महाराष्ट्रातून प्रवास करायचा आहे त्यांना योग्य कारण असल्यास परवानगी दिली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.    सध्या अत्यावश्यक सेवेसाठी पुणे पोलिसांकडून शहरातील अंतर्गत प्रवासासाठी डिजिटल पास वितरित करण्यात आले आहेत. हा पास मिळवून तो पोलिसांना दाखवल्यास शहरात प्रवास करता येणार असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTravel Tipsट्रॅव्हल टिप्सPoliceपोलिस