करडे येथील यात्रा उत्साहात
By Admin | Updated: November 17, 2016 02:05 IST2016-11-17T02:05:32+5:302016-11-17T02:05:32+5:30
करडे (ता. शिरूर) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाचा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला, तर सुट्या पैशांअभावी अनेकांना यात्रेचा आनंद मोकळेपणाने लुटता आला नाही.

करडे येथील यात्रा उत्साहात
निमोणे : करडे (ता. शिरूर) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाचा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला, तर सुट्या पैशांअभावी अनेकांना यात्रेचा आनंद मोकळेपणाने लुटता आला नाही.
करडे -लंघेवाडी -चव्हाणवाडी (ता. शिरूर) सह पंचक्रोशीतील ग्रा. श्री भैरवनाथ देवाचा वार्षिक यात्रा महोत्सव नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सोमवार, दि. १४ रोजी श्रींची महापूजा, रात्री ८.००वा. श्रींस पोषाखविधी, पालखीची मिरवणूक व रात्री १२.०० ते पहाटे पाच वाजेपर्यंत सत्संग आणि संगीत भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्याचप्रमाणे रात्री १०. ०० कै. तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल पाचर्णे, शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामभाऊ सासवडे, उपसरपंच व यात्रा कमिटीचे अध्यक्ष गणेश रोडे, माजी सरपंच बाळासाहेब बांदल, पोपटराव लंघे, राजेंद्र जगदाळे पाटील, संतोष लंघे, बाळासाहेब वाळके, सुधीर जगदाळे, बबन वाळके, विशाल घायतडक यांसह ग्रामस्थ कुस्तीप्रेमी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
पंच म्हणून पोपटराव लंघे, मधुकर घायतडक, फक्कड रोडे, कैलास पाचर्णे, बाळासाहेब घायतडक यांनी काम पाहिले.चालू वर्षी नुकतेच ग्रामस्थांनी दीड कोटी रुपये खर्च करून ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर उभारले आहे व परिसराचा विकास केला आहे. या नवीन मंदिर, प्रवेशव्दारासह सार्वजनिक इमारतींवर केलेली नयनरम्य रोषणाई, नवीन आखाडा, खाऊ, खेळण्यांची दुकाने त्यामुळे या वर्षाच्या यात्रेला विशेष रंगत आली होती.(वार्ताहर)