तळवडेत भीषण अपघात; २ ठार तर १ जखमी
By Admin | Updated: January 7, 2017 20:13 IST2017-01-07T20:13:56+5:302017-01-07T20:13:56+5:30
दुचाकी आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकी दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तळवडे येथे घडली.

तळवडेत भीषण अपघात; २ ठार तर १ जखमी
>ऑनलाइन लोकमत
पिंपरी- चिंचवड, दि. ७ - दुचाकी आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकी दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास तळवडे सॉफटवेअर टेक्नॉलॉजी पार्क येथे हा अपघात झाला. राजकुमार संभाजी जाधव (वय २०, रा. हळदगाव, जळकोट, लातूर) आणि माधव विद्यासागर सिरसे (वय २६,रा. पाटोदा ब्रुद्रुक) अशी मृतांची दोघांची नावे आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी तीनजण एकाच दुचाकीवरून चाकणकडे जात होते. तळवडे येथून जात असताना त्यांची दुचाकी घसरली, त्याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकची त्यांना जोरात धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील राजकुमार आणि माधव या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर पाठीगमागे बसलेले लखन हणमंतराव जाधव गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मुन्ना महेश्वर चौधरी (रा.मुंबई) या ट्रक चालकाला देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मूळचा लातूरचा असलेला राजुकुमार हा संगणक अभियंता होता. नोकरीनिमित्त तो पुण्यात आला होता. त्यासह त्याचे अन्य दोन सहकारी मूळचे मराठवाड्यातील असून सध्या ते डोंगरवस्ती तळवडे येथे राहत होते.