प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणीला केले आत्महत्येस प्रवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:10 IST2021-03-23T04:10:24+5:302021-03-23T04:10:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्यानंतर झालेल्या वादातून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हडपसरमधील हिंगणेमळा येथील बाळासाहेब ...

Trapped in a love trap, the young woman committed suicide | प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणीला केले आत्महत्येस प्रवृत्त

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणीला केले आत्महत्येस प्रवृत्त

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्यानंतर झालेल्या वादातून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हडपसरमधील हिंगणेमळा येथील बाळासाहेब गवळी बिल्डिंगमध्ये रविवारी सकाळी ६ वाजता ही घटना घडली.

ज्योती कैलास जगताप (वय १८) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय कैलास जगताप (वय २२, रा. हिंगणेमळा, हडपसर) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी किरण भाऊ शिंदे (रा. वैदुवाडी, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अक्षय जगताप यांचा चुलत मामाचा मुलगा किरण याने ज्योती जगताप हिला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. तिला तो बोलण्यासाठी व भेटण्यासाठी वारंवार बोलावून त्रास देत होता. त्याच्या या छळवणुकीला कंटाळून ज्योती हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी ६ वाजता ज्योतीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

Web Title: Trapped in a love trap, the young woman committed suicide