तोतया डॉक्टरांची भुरटेगिरी

By Admin | Updated: May 23, 2014 04:46 IST2014-05-23T04:46:08+5:302014-05-23T04:46:08+5:30

हॅलो... मी डॉक्टर बोलतोय... तुमचा पेशंट आमच्या हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहे... त्यांचे तातडीने आॅपरेशन करावे लागणार आहे...

Trap theft of doctors | तोतया डॉक्टरांची भुरटेगिरी

तोतया डॉक्टरांची भुरटेगिरी

पुणे : हॅलो... मी डॉक्टर बोलतोय... तुमचा पेशंट आमच्या हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहे... त्यांचे तातडीने आॅपरेशन करावे लागणार आहे... त्यासाठी अमुक एवढा खर्च येणार आहे... पैसे तुम्हाला तातडीने द्यावे लागतील... माझा ड्रायव्हर हॉस्पिटलच्या खाली उभा आहे... त्याच्याकडे तातडीने पैसे द्या... असा फोन आल्यानंतर गर्भगळीत झालेले नातेवाईक तातडीने पैसे जमा करून डॉक्टरांनी सांगितलेल्या व्यक्तीकडे देतात. पण, नंतर फोन केलेला कोणताच डॉक्टर रुग्णालयात नाही आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. महिन्याभरात अशा घटना वाढल्या आहेत. पोलिसांकडून तोतया डॉक्टरांचा तपास सुरू आहे. रुग्णांना लुबाडणार्‍या तोतया डॉक्टरांची टोळी शहरात कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Trap theft of doctors