वाहतूककोंडीने पुणेकर वेठीस
By Admin | Updated: January 13, 2015 05:48 IST2015-01-13T05:48:30+5:302015-01-13T05:48:30+5:30
मध्यवर्ती शहरातील काही रस्त्यांवर आज सायंकाळनंतर वाहतूककोंडी झाली. सिग्नल बंद असल्याने आणि वाहतूक पोलीससुद्धा चौकांमध्ये नसल्याने नागरिकांना मनस्ताप झाला.

वाहतूककोंडीने पुणेकर वेठीस
पुणे : मध्यवर्ती शहरातील काही रस्त्यांवर आज सायंकाळनंतर वाहतूककोंडी झाली. सिग्नल बंद असल्याने आणि वाहतूक पोलीससुद्धा चौकांमध्ये नसल्याने नागरिकांना मनस्ताप झाला.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे कार्यक्रम पुण्यात असताना त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासाठी रस्ते बंद केले जातात. त्यामुळे वाहतूक दीर्घकाळ तुंबून राहते. वाहनचालक हॉर्न वाजवीत राहतात. अशा वाहनांची रांग लांबवर गेल्यानंतर अरुंद रस्त्यांवरही वाहतूककोंडी होते, असे गेल्या काही दिवसांपासून जाणवत आहे. त्यातच बेशिस्त वाहनचालकांमुळेसुद्धा वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र आहे.
आजही सायंकाळनंतर कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, पुणे विद्यापीठ रस्ता, विधी महाविद्यालय रस्त्यावर तसेच शिवाजीनगर भागात काही ठिकाणी वाहतूककोंडीचा मनस्ताप नागरिकांना झाला.
काही चौकांमधील सिग्नलही बंद असल्याने या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली. काही ठिकाणी नागरिक स्वतच वाहतुकीचे नियमन करण्याचा व कोंडी फोडण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. या वाहतुककोंडीमुळे पुणेकरांना अक्षरश: वेठीस धरले होते. त्यामुळे दिवसभर नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
(प्रतिनिधी)