शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूककोंडीवर लवकरच तोडगा, पौड रस्त्यावर मेट्रोचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 03:33 IST

पौड रस्त्यावर आयडियल कॉलनी चौक ते वनाझ या भागात मेट्रोचे काम वेग घेत आहे व त्यामुळे येथे रोजच मोठी वाहतूककोंडी होत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेऊन आज वाहतूक अधिकारी, स्थायी समिती अध्यक्ष व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पाहणी केली. त्यानंतर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

कोथरूड : पौड रस्त्यावर आयडियल कॉलनी चौक ते वनाझ या भागात मेट्रोचे काम वेग घेत आहे व त्यामुळे येथे रोजच मोठी वाहतूककोंडी होत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेऊन आज वाहतूक अधिकारी, स्थायी समिती अध्यक्ष व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पाहणी केली. त्यानंतर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.गेल्या काही दिवसांपासून मेट्रोचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे दररोज परिसरात कोंडी होत आहे. परिणामी नागरिक त्यामुळे पुरते त्रस्त झाले आहेत. त्यावर काही तरी उपायोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे. त्यावर उपाय करण्यासाठी आज पाहणी करण्यात आली. पाहणी करताना स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, भाजपाचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, महामेट्रोचे चिफ प्रोजेक्ट मॅनेजर गौतम बिरहाडे, रितेश गर्ग, नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनीचे नामदेव गव्हाणे, सहायक पोलीस आयुक्त वाहतूक प्रभाकर ढमाले, पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी, प्रभाग समितीचे अध्यक्ष दिलीप वेडे पाटील, स्थानिक नगरसेविका हर्षाली माथवड, वासंती जाधव, अल्पना वर्पे, किरण दगडे पाटील, डॉ. श्रद्धा प्रभुणे पाठक आदी उपस्थित होते.कोंडीवरील उपाययोजना१ एमआयटी शाळा चौक ते आयडियल कॉलनी चौकादरम्यान रस्त्याच्या मधोमध मेट्रोच्या पिलरचे काम केले जाणार असून पिलरच्या दोन्ही बाजुने एकेरी वाहतूक सुरू ठेवणार.२ वनाझ कंपनीकडून पौड फाट्याकडे जाताना कृष्णा हॉस्पिटलसमोर अजंठा अव्हेन्यूकडे जाणारा रस्त्याचा छेद प्रायोगिक तत्त्वावर बंद करण्यात येणार असून नागरिकांना आयडियल कॉलनी चौक (आनंदनगर) येथून यू टर्न घेऊन अजंठा अव्हेन्यूकडे जाता येईल. दोन दिवसांनी आवश्यक बदल करून १० दिवस प्रायोगिक तत्त्वावर हा बदल अंमलात आणला जाणार आहे.३ प्रतीकनगर येथे असलेले म्हसोबा मंदिर हे नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. मात्र येथील नागरिकांशी चर्चा करून वाहतुकीस अडथळा ठरणारे हे मंदिर पर्यायी जागेत स्थालांतरित करण्याबाबत सर्वांनी सहमती दर्शविली.४ संपूर्ण पौड रस्ता हा नोपार्किंग नो हॉल्टिंग झोन करण्याचा निर्णय.५ महावितरणचे काही डीपी व विद्युत पोलही हलविण्यात येणार६ शिवतीर्थनगर समोरील रस्तामात्र क्रॉसिंगसाठी खुला ठेवण्यात येणार. मात्र येथील पीएमपीचा थांबा स्थलांतरित करणे व दोन थांबे मागे पदपथावर हलविण्याबाबतही एकमत झाले.७ वनाझ समोरील एसटी बसथांबा हलविणे व तेथील अनावश्यकरित्या उभारलेले ६ बस शेड काढून टाकण्याचा ही निर्णय घेण्यात आला.८ अनेक ठिकाणी पदपथ लहान करणे व दुचाकी पार्किंगसाठी रँप करणेबाबत ही निर्णय.९ तसेच संपूर्ण रस्त्यावर ट्रॅफिक वॉर्डन नेमणे व सायंकाळी गर्दीच्या वेळी वाहतूक नियंत्रण करण्याबाबतचे नियोजन करण्यात आले.१० सायंकाळी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून वडा /भजी /भेळ इ. विक्रीसाठी हातगाड्या उभ्या राहतात व त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. त्यावर कारवाईचे आश्वासन देण्यात आले.अवघ्या सहा महिन्यांत पौड रस्त्यावरील पिलर उभे राहतील, असा मेट्रोचा प्लॅन असून तोपर्यंत कोथरूडकरांना त्रास होऊ नये, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.- संदीप खर्डेकरमेट्रोचे काम सुरू झाल्याने या भागात कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने आज पाहणी करण्यात आली. येत्या दहा दिवसांत उपाययोजनांवर काम करण्यात येईल.- मुरलीधर मोहोळ,अध्यक्ष, स्थायी समिती

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रो