खासगी वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूककोंडी
By Admin | Updated: June 13, 2015 22:38 IST2015-06-13T22:38:26+5:302015-06-13T22:38:26+5:30
शहरातील मंचर-घोडेगाव रस्ता वर्दळीचा आहे. या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते. सदर रस्त्यालगत दोन्ही बाजूंना खासगी वाहने सर्रास उभी केली जातात.

खासगी वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूककोंडी
मंचर : शहरातील मंचर-घोडेगाव रस्ता वर्दळीचा आहे. या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते. सदर रस्त्यालगत दोन्ही बाजूंना खासगी वाहने सर्रास उभी केली जातात. तसेच माल घेऊन येणारी वाहने रस्त्यालगत उभी असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मंचर-घोडेगाव रस्त्याच्या दोन्ही बाजुंना खाजगी वाहने सर्रास उभी केली जातात. विशेषत:, अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने रस्त्याच्या लगतच उभी असतात. काही व्यावसायिक त्यांचा माल घेऊन येणारी वाहने दुकानासमोर उभी करून त्यातून माल उतरून घेतात. मात्र त्यामुळे रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होते. अनेक वाहनचालक त्यांची वाहने रस्त्यालगत उभी करून निघून जातात. त्यामुळे वारंवार वाहतुकीचा खोळंबाा होतो. वाहनांच्या लांबवर रांगा लागतात. श्री क्षेत्र भीमाशंकर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना याचा त्रास सहन करावा लागतो.
शहरातील रस्ते वाहतुकीसाठी अपुरे पडत आहेत. दोन वाहने एकमेकांना कशीबशी पास करून जातात. दोन मोठी वाहने समोरासमोर आली तर कोंडी ठरलेली असते. साळी हॉस्पिटल ते शिवाजी चौक या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटचे काम पूर्ण होऊन अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. त्यामुळे हा रस्ता रुंद झाला आहे. मात्र, रस्त्याच्या कामाला सुरूवात झालेली नाही. हा रस्ता पूर्वीसारखाच अंद आहे. पोलिसांनी रस्त्यालगत अवैधरीत्या उभी राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, तसेच ‘नो पार्किंगचे फलक लावण्याची मागणी होत आहे.