शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

बंदोबस्तात दूध वाहतूक!, संकलन बंद, मात्र तुटवडा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 23:28 IST

भोर तालुक्यातील शेतकरी, दूध संस्थांनी संकलन बंद ठेवले असून, दूध रस्त्यावर ओतून आंदोलनाला पाठिंबा दिला

पुणे- भोर तालुक्यातील शेतकरी, दूध संस्थांनी संकलन बंद ठेवले असून, दूध रस्त्यावर ओतून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात होणारा दुधाचा पुरवठा बंद झाला आहे. यामुळे दुधाचा तुटवडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे.भोर शहरातील रामबाग येथील पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या दूध संकलन केंद्रावर दररोज ७,५०० लिटर, तर अनंत दूध या खासगी संस्थेचे ८ हजार लिटर व घरोघरी जाऊन खासगी दूध घालणाऱ्या शेतकºयांकडील २,५०० हजार लिटर असे १८ ते २० हजार लिटर दूध दररोज भोर तालुक्यातील पश्चिम भागातून जाते. मात्र, जिल्हा दूध संघ व अनंत दूध डेअरीवरील दूधसंकलन तसेच खासगी दूध उत्पादकांचे दुधाचे संकलन बंद आहे. आजपासून दुधाचा तुटवडा भासू लागला आहे. शिरूर तालुक्यात सरासरी पाच ते सहा लाख लिटर दुधाचे संकलन होत असून, या संकलनावर आंदोलनाचा संमिश्र परिणाम दिसत आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वाधिक दूधसंकलन असणाºया इनामगाव, मांडवगण फराटा या गावांत मात्र संकलनावर परिणाम जाणवत आहे.तालुक्यात होत असलेल्या पाच ते सहा लाख लिटर दुधापैकी पूर्व भागात सर्वाधिक दीड लाख लिटरपर्यंत संकलन होते. यात इनामगाव, मांडवगण फराटा, निमोणे, नागरगाव, गणेगाव या गावांत सर्वाधिक संकलन होते. या गावांमध्ये राजू शेट्टींच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दूधसंकलन ठप्प झाल्याचे चित्र आहे.निमोण्यात मात्र अल्पसा प्रतिसाद जाणवला. इनामगावात शेतकºयांनी रस्त्यावर येऊन दुधाने अंघोळ करून आंदोलन केले. इनामगावमध्ये दररोज २५ हजार लिटर दुधाचे संकलनहोते. या संकलनावर परिणाम झाला आहे. वर्षभरापूर्वी दुधाला २९ ते ३० रुपये प्रतिलिटर भाव मिळतहोता. तो १६ ते १७ रुपयांवर पोहोचल्याने दर दिवसाला एकट्या इनामगावात तीन लाख रुपयांचा दूधधंद्याला फटका बसल्याचे इनामगावचे रहिवासी, श्रीगोंदा साखर कारखान्याचे संचालक श्रीनिवास धाडगे यांनी सांगितले. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात शेतकºयांनी महादेवाच्या पिंडीला दुधाने अभिषेक घालून आंदोलन केले.>महामार्गावर सतत पोलिसांचा पहारापळसदेव : इंदापूर तालुका हा दूधधंद्यात अग्रेसर आहे. नेचर डिलाईट डेअरी, सोनाई दूध संघ, मंगलसिद्धी दूध संघ या खासगी प्रकल्पासह दूधगंगा हा सहकारी दूध संघ आहे. दररोज या दूध संघांचे ५० लाख लिटर एकत्रित मिळून ‘संकलन’ आहे. चार दिवसांपासून दूध वाहतूक रोखण्यात येत आहे. असे असतानासुद्धा पुणे, मुंबई या शहरांना पोलीस बंदोबस्तात येथून दूधपुरवठा सुरू आहे. महामार्गावर सतत पोलिसांचा कडक पहारा व गस्त सुरू आहे. भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निळकंठ राठोड यांनी सांगितले, एक पथक तैनात आहे. तर, २५ पोलिसांची सतत गस्त (पेट्रोलिंग) सुरू आहे.>पुरंदर तालुक्यात निम्मे संकलन घटलेजेजुरी : या आंदोलनाला पुरंदरमधून मात्र संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. पुरंदर तालुक्यातील सर्वांत मोठी दूध संकलन संस्था आनंदी दूध या संस्थेचे दररोजचे साधारणपणे २८ ते ३० हजार लिटर दूध संकलन होते. आंदोलनामुळे संकलनावर परिणाम झाला आहे. हे संकलन २० ते २१ हजार लिटरवर आलेले आहे. याशिवाय अनंत, सोनाई, डायनॅमिक्स, टेकवडे अ‍ॅग्रो या दूधसंकलन संस्थांवरही परिणाम झाला आहे. या सर्वच संस्थांचे दररोजचे ७० ते ७५ हजार लिटर दूधसंकलन आहे. आंदोलनामुळे ते ५० ते ५५ हजार लिटरवर आलेले आहे. आंदोलनात दूध उत्पादकांनी सहभाग घेतल्याचे दिसत असले, तरीही तो संमिश्र आहे. अनेकदूध उत्पादक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.सासवड आणि जेजुरी ही दोन मोठी नगरपालिका असणारी शहरे आहेत. येथील मोठ्या नागरी वस्तीची दररोज ३० ते ३५ हजार लिटर दुधाची गरज दूधविक्रेते भागवतात. गोकुळ, सोनाई, गोविंद, स्वराज, नवनाथ, आनंदी या संस्थांचे दूध विक्रीसाठी येत आहे. दूध संस्थांच्या गाड्या बाहेरून येत असतात. आंदोलकांच्या भीतीने वाहने येत नसल्याने विक्रेत्यांना खासगी गाड्या पाठवून दूध आणावे लागत आहे.

टॅग्स :milkदूधMilk Supplyदूध पुरवठा