परिवहन विभागाची शुल्क दरवाढ
By Admin | Updated: January 14, 2017 03:13 IST2017-01-14T03:13:19+5:302017-01-14T03:13:19+5:30
परिवहन विभागाच्या वतीने विविध शुल्कांमध्ये दरवाढ करण्यात आली आहे. दरवाढीमध्ये प्रामुख्याने पासिंगचे विलंब शुल्क

परिवहन विभागाची शुल्क दरवाढ
बारामती : परिवहन विभागाच्या वतीने विविध शुल्कांमध्ये दरवाढ करण्यात आली आहे. दरवाढीमध्ये प्रामुख्याने पासिंगचे विलंब शुल्क ४०० रुपये महिनावरून प्रतिदिन ५० रुपये झाले आहे. याशिवाय राज्य शासनाचादेखील प्रतिमहिना ४०० रुपये दंड वसूल केला जात आहे. दुहेरी पद्धतीची दरवाढ मान्य नसल्याची भूमिका बारामती तालुका वाहतूक संघाने घेतली आहे. बारामती तालुका वाहतूक संघाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
परिवहन विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी केलेली दरवाढ अन्यायकारक आहे. त्यामुळे वाहतूक व्यवसाय मोडकळीस येईल. आमचे संसार उघड्यावर येतील. ही दरवाढ मागे घ्यावी; अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा, संघाने दिला आहे.
याबाबत वाहतूक संघाने केंद्रीय वाहतूकमंत्री, राज्याच्या परिवहनमंत्र्यांसह परिवहन आयुक्तांना साकडे घातले आहे. वाहतूक महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष तानाजी बांदल, तालुका संघाचे अध्यक्ष जहीद बागवान, उपाध्यक्ष अशोक मोरे, सतीश भाले, मजिद तांबोळी, नाना गावडे, विष्णू भोकरे, अनूप जगताप, राजेंद्र गायकवाड आदींनी बरामतीचे उपविभागीय परिवहन अधिकारी अनिल वळीव यांना निवेदन दिले.