वाहतूक पोलीसही होणार स्मार्ट

By Admin | Updated: October 28, 2015 01:34 IST2015-10-28T01:34:15+5:302015-10-28T01:34:15+5:30

स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या पुणे शहरातील वाहतूक पोलीस विभागही आता स्मार्ट होणार आहे. वाहतूक शाखेचे दैनंदिन कामकाज पेपरलेस करण्यासाठी वाहतूक

Transport Police will be smart too | वाहतूक पोलीसही होणार स्मार्ट

वाहतूक पोलीसही होणार स्मार्ट

पुणे : स्मार्ट सिटीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या पुणे शहरातील वाहतूक पोलीस विभागही आता स्मार्ट होणार आहे.
वाहतूक शाखेचे दैनंदिन कामकाज पेपरलेस करण्यासाठी वाहतूक शाखेसाठी ट्रॅफमॅन ही संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून अपघातापासून वाहतूक शाखेकडून करण्यात आलेल्या कारवाईच्या माहितीचा अहवाल एका क्लिकवर मिळणार आहे.
राज्यातील अशा प्रकारची ही पहिलीवहिली संगणक प्रणाली
असून, राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या हस्ते या
संगणक प्रणालीचे नुकतेच उद्घाटन करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आवाड
यांनी दिली. डिसॉफ्ट ग्लोबलटेक
या कंपनीच्या सहकार्याने ही
संगणक प्रणाली विकसित
करण्यात आली असून, स्मार्ट फोन, टॅबलेट तसेच लॅपटॉपवर उपलब्धतेनुसार, ही संगणक प्रणाली वापरता येणे शक्य असल्याचे आवाड यांनी सांगितले.(प्रतिनिधी)

Web Title: Transport Police will be smart too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.