शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

ससून रुग्णालयात महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल ; नातेवाईकांना मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 15:36 IST

दोन महिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मंगळवारी सकाळी ससून रुग्णालयात या महिलांच्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़.

ठळक मुद्देदुःखद प्रसंगी नातेवाईकांना भयंकर मनस्ताप

पुणे : ससून रुग्णालयात मंगळवारी सकाळी दोन महिलांच्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. याबाबतची माहिती अशी, जया सपकाळ (वय ३९, रा़ रामटेकडी) यांचे सोमवारी निधन झाले होते़. त्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह ससून रुग्णालयाच्या शवागारात आणण्यात आले़. त्याठिकाणी आणखी एक मयुरी काळे (वय २०) यांचा मृतदेह आणण्यात आला होता़.काळे आणि सपकाळ या दोन्ही महिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दोन्ही सारख्याच केसेस असल्याने ही अदलाबदल झाली असल्याचे ससून रुग्णालयातून सांगण्यात आले़. सिंहगड पोलीस व काळे यांचे नातेवाईक मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता ससून रुग्णालयातील शवागारात आले़. पोलिसांच्या उपस्थितीत काळे यांच्या नातेवाईकांकडे मृतदेह ताब्यात देण्यात आला़. ते अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन गेले़. त्यानंतर सपकाळ यांचे नातेवाईक दुपारी एकच्या सुमारास त्यांचा मृतदेह घेण्यासाठी ससून रुग्णालयात आले होते़. त्यांनी अंत्यसंस्काराची सर्व तयारी केली होती़. रुग्णवाहिकाही बोलविण्यात आली़. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ते शवागारात गेले़. त्यांनी मृतदेह पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले की, ही दुसरीच महिला आहे़.आपल्याकडून मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे लक्षात आल्यावर तेथील कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली़. शोधाशोध केल्यावर दोन ते तीन तासांपूर्वी काळे या महिलेचा मृतदेह म्हणून सपकाळ यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याचे समोर आले़. इकडे अंत्यसंंस्कारासाठी मयुरी काळे यांचा मृतदेह घेऊन गेलेल्या नातेवाईकांनाही हा मृतदेह तिचा नसल्याचे लक्षात आले़. त्याचवेळी त्यांना ससून रुग्णालयातून फोन गेल्यावर सर्व प्रकाराचा उलगडा झाला़. त्यांना मृतदेह परत आणण्यास सांगण्यात आले आहे़. काळे यांचे नातेवाईक मृतदेह घेऊन पुन्हा ससून रुग्णालयात आले. व तोपर्यंत सपकाळ यांचे नातेवाईक शवागारापाशी तटकळत बसून होते़. 

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलDeathमृत्यू