शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

धरणात बुडताहेत परप्रांतीय, ८ घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 02:07 IST

मुळशी धरण क्षेत्र : सहा महिन्यांत ८ घटनांमध्ये १२ जणांचा मृत्यू

पौड : मुळशी धरणात बुडालेल्या विपुल सक्सेना या तरुणाचा मृतदेह सापडला. विपुल सक्सेना (वय २९) व त्याचा मित्र हिमांशु चंदवानी (वय २८) दोघेही मूळचे राहणार अहमदाबाद गुजरातचे. विपुल व हिमांशू हे दोघे जण दि. ३० रोजी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास मौजे वळणे गावाच्या हद्दीत मुळशी धरणात पोहण्यासाठी उतरले असताना विपुल सक्सेना हा पाण्यात बुडाला होता. पौड पोलिसांनी तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक लोकांचे मदतीने तत्काळ शोधकार्य सुरु केले होते.

पौड पोलीस व मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने दि. ३० रोजी विपुलचा शोध घेण्यात आला होता परंतु उशीर झाल्याने रात्री शोध कार्य थांबवावे पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरू केल्यानंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास विपुलचा मृतदेह शोधण्यात पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीमला यश आले. या शोधमोहिमेत मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापनचे कार्यकर्ते प्रमोद बलकवडे व त्यांचे सहकारी अमित कोतवाल, शंकर वरपे, कैलास परदेशी, सागर जाबरे, निलेश कुसाळकर, कर्णिक शहा, पंढरीनाथ जोरी, नामदेव गुंजाळ, विनायक जोरी यांनी विपुलचा शोध घेण्यासाठी परिश्रम घेतले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पौड पोलिसांनी कळविले आहे.मुळशी धरणाला टाटा कंपनीने धरणाच्या बाजूने जागोजागी सुरक्षा भिंती तसेच सुरक्षारक्षक नियुक्त केले असले तरी या भागात फिरायला येणारे उत्साही तरुण चोरून धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरतात. विशेषत: परप्रांतीय तरुणांना येथील पाण्याच्या खोलीचा व प्रवाहाचा अंदाज नसल्याने अशा बुडण्याच्या घटना घडतात. यात शिक्षण व नोकरी निमित्ताने पुण्यात शिक्षणासाठी आलेले तरुण या भागात फिरायला आल्यानंतर असे जिवावर बेतणारे धाडस करतात आणि अपघात ओढवून घेतात.का बुडतात तरुणच ?मागील सहा माहिन्यांत मुळशी तालुक्यातील धरण व अन्य जलसाठ्यात बुडून मरण्याची ही आठवी घटना आहे. तर एक घटना देवकुंड धबधब्यात घडली होती. यात बुडणारे हे बहुतेक तरुणच आहेत. व त्यातही धरणात बुडणाºयामध्ये परप्रांतीय तरुण अधिक आहेत. एप्रिल महिन्यात पिंपळोली -खांबोली येथील धरणात तीन शिबिरार्थी व अन्य एक असे चार जण बुडाले. तर त्यानंतर जुलै माहिन्यात एक जण वरसगाव धरणात, आॅगस्ट महिन्यात एक जण मुठा नदीपात्रात, सप्टेंबर महिन्यात बोतरवाडी दोघे जण स्थानिक तरुण येथील शेततळ्यात, एक जण मुळशी धरणात, तसेच अन्य एका घटनेत अंबडवेट येथील दोघे जण बुडाले होते. मागील आठवड्यात देवकुंड धबधब्यात दोघे जण बुडाले. या आठवड्यात मुळशी धरणात विपुलचा बळी गेला.तरुणांनी फिरायला जाताना घ्यावयाची काळजी यासंबंधीची माहिती त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी व महाविद्यालयांमध्ये देण्याची गरज असल्याचे मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमुख प्रमोद बलकवडे यांनी सांगितले.- प्रमोद बलकवडे,मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमुख

टॅग्स :PuneपुणेDamधरण