पुणे : मध्य रेल्वेनेजेजुरीरेल्वे स्थानकाला खंडोबा देवस्थानाचे रूप देऊन कायापालट केला आहे. स्थानकाचे प्रवेशद्वार हुबेहूब देवस्थानाच्या प्रवेशद्वारप्रमाणे साकारण्यात आल्याने भाविक प्रवाशांच्या पसंतीस उतरले आहे. रेल्वेकडून धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शहरांमधील रेल्वे स्थानकांचे रुपडे पालटले जात आहे. या भागात येणाºया रेल्वे प्रवाशांसाठी ही शहरे आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. या अनुषंगाने प्रवाशांना रेल्वे स्थानकात आल्यानंतर सुखद अनुभव मिळावा यासाठी देशभरात हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. स्थानिक ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व, संस्कृती विचारात घेऊन संबंधित स्थानकाचे रुपडे पालटले जात आहे. या पार्श्वभूमीवर जेजुरी रेल्वे स्थानकाला नवे रूप देण्यात आले आहे. येथील खंडोबा देवस्थानाचे आकर्षक रुप साकारण्यात आले आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाचे हे प्रवेशद्वार भाविक प्रवाशांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.
जेजुरी रेल्वे स्थानकाचा कायापालट; स्थानकाला खंडोबा देवस्थानाचे रूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 13:30 IST
रेल्वेकडून धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या शहरांमधील रेल्वे स्थानकांचे रुपडे पालटले जात आहे.
जेजुरी रेल्वे स्थानकाचा कायापालट; स्थानकाला खंडोबा देवस्थानाचे रूप
ठळक मुद्देरेल्वे स्थानकाचे हे प्रवेशद्वार भाविक प्रवाशांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू