नऊ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:10 IST2017-08-04T03:10:08+5:302017-08-04T03:10:08+5:30

शहरातील काही पोलीस ठाण्यांमधील ९ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत.

 Transfers under nine police inspectors | नऊ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

नऊ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे : शहरातील काही पोलीस ठाण्यांमधील ९ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. कोथरूड पोलीस ठाण्याचे रघुनाथ विठ्ठल फुगे, शिवाजीनगरचे मिलिंद गायकवाड, वाहतूक शाखेचे दत्तात्रय पाटील, विशेष शाखेच्या कल्पना जाधव यांचा समावेश आहे.
मिलिंद गायकवाड यांची कोंढवा पोलीस ठाणे, विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे कमलाकर ताकवले यांची भारती विद्यापीठ, नियंत्रण कक्षाचे कल्याण पवार यांची उत्तमनगर पोलीस ठाणे, वाहतूक शाखेचे अनिल गुलाबराव पाटील यांची दत्तवाडी पोलीस ठाणे, महिला सहाय्यता कक्षाच्या संगीता पाटील यांची विश्रांतवाडी पोलीस ठाणे, विशेष शाखेच्या कल्पना जाधव यांची महिला सहायता कक्ष, वाहतूक शाखेचे प्रभाकर शिंदे यांची शिवाजीनगर पोलीस ठाणे तर कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ फुगे यांची वाहतूक शाखा आदी पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.

Web Title:  Transfers under nine police inspectors