सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या
By Admin | Updated: May 10, 2017 04:24 IST2017-05-10T04:24:57+5:302017-05-10T04:24:57+5:30
पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या आदेशावरून सहा सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. चतु:श्रृंगी विभागाच्या

सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या बदल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या आदेशावरून सहा सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. चतु:श्रृंगी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त वैशाली माने - जाधव यांची प्रशासन विभागात, वानवडी विभागाचे रवींद्र रसाळ यांची विशेष शाखा, वाहतूक शाखेच्या प्रिती टिपरे यांची विशेष शाखा, विशेष शाखेतील विक्रम पाटील यांची चतु:श्रृंगी विभागात बदली करण्यात आली आहे. तर जळगाव येथून पुण्यात बदली झालेले सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांची वानवडी विभागात व रत्नागिरीच्या जयश्री गायकवाड यांची वाहतूक विभागात नियुक्ती करण्यात आली. पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस निरीक्षक कैलास पिंगळे आणि रामचंद्र जाधव यांची तसेच पुणे शहर पोलीस दलातील गौतम पातारे यांची दहशतवाद विरोधी पथकात बदली करण्यात आली आहे.