शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पोलीस दलातील 'बदल्यां'चा धडाका सुरूच राहणार ! अमिताभ गुप्तांचे 'संकेत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 19:06 IST

आयुक्तालयाअंतर्गत नवीन पोलीस ठाणी निर्माण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देउपायुक्त, सहायक आयुक्तांच्या लवकरच बदल्यापुण्यात आणखी एका परिमंडळाची आवश्यकता   

पुणे : पुणे शहर वाढत असून त्यात ग्रामीण पोलीस दलातील काही भाग पुणे पोलीस आयुक्तालयात समावेश करण्यात येणार आहे. तसेच आयुक्तालयाअंतर्गत नवीन पोलीस ठाणी निर्माण करण्यात येणार आहे. पुण्यात आणखी एक परिमंडळाची आवश्यकता असून शहर पोलीस दलातील विभागाची फेररचना करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.  पुणे शहरात सध्या ५ परिमंडळांमध्ये ३० पोलीस ठाण्यांची विभागणी करण्यात आली आहे. 

पुणे शहरातील अनेक प्रस्ताव गृह विभागाकडे प्रलंबित आहे. चतु:श्रृंगी, हडपसर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक नवीन पोलीस ठाणे तयार करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. तसेच हवेली, लोणी काळभोर पोलीस ठाणे शहर पोलीस दलात समावेश करण्याचा प्रस्तावाला मंजुरी मिळाली असली तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही.

याबाबत पोलीस आयुक्त गुप्ता म्हणाले, हवेली, लोणी काळभोर पोलीस ठाणे तसेच अन्य नवीन पोलीस ठाण्यांबाबतच्या प्रस्तावाचा आढावा घेत आहे. त्याचबरोबर शहरात आणखी एक परिमंडळाची आवश्यकता वाढत आहे. त्यादृष्टी पोलीस ठाणे व विभागांची फेररचना करण्याचा विचार आहे. सध्या त्यावर चर्चा सुरु असून काही दिवसात प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल. शहरातील पोलीस उपायुक्त आणि सहायक पोलीस आयुक्त यांच्या बदल्याही प्रस्तावित आहेत. शहरात मेट्रोचे काम सुरु आहे. त्यादृष्टीने आवश्यक वाहतूकीच्या नियोजनाचा आराखडा तयार केला जात आहे. पुढील २५ वर्षांचा विचार करुन वाहतूक सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असून त्यामध्ये पोलीस आपल्यापरीने योगदान देत आहे. ................

नवरात्र मंडळे, मंदिर विश्वस्तांच्या बैठका घेणारशासनाने अद्याप मंदिर उघडण्यास परवानगी दिलेली नाही. नवरात्र उत्सव जवळ आला आहे.अशावेळी शहरातील प्रमुख देवींची मंदिरांचे विश्वस्तांची बैठक घेण्यात येणार आहे. नवरात्र काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पोलीस प्रयत्नशील राहतील, असे त्यांनी सांगितले.

..........

सीसीटीव्ही संख्या वाढविणारपुण्यात रोडवर बसविण्यात आलेले सीसीटीव्हीचे नेटवर्क आता जुने झाले असून त्यावरील कॅमेऱ्यांची गुणवत्ताही कमी झाली आहे. त्यामुळे जुने व खराब झालेले कॅमेरे बदलणे, नवीन ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे व नेटवर्क सक्षम करण्याचा प्रयत्न सुरु आहे.सध्या साधारण १ हजार सीसीटीव्ही रोडवर आहेत. त्याची संख्या दीड हजारांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता यांनी सांगितले.

 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसTransferबदलीcommissionerआयुक्त