शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शिक्षण मंडळाच्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्यांवर संक्रांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 13:06 IST

पुणे विभागीय शिक्षण मंडळाच्या नियुक्त्या केल्या रद्द

ठळक मुद्दे पुणे विभागीय शिक्षण मंडळावर नियुक्त केलेल्या सहा सदस्यांचा समावेश

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुण्यासह सर्व विभागीय मंडळावरील विविध संवर्गातील रिक्त पदांवर करण्यात आलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. त्यात पुणे विभागीय शिक्षण मंडळावर नियुक्त केलेल्या सहा सदस्यांचा समावेश आहे.

राज्याच्या शिक्षण विभागातर्फे १३ सप्टेंबर २०१९ रोजी पुणे विभागीय शिक्षण मंडळासह राज्यातील नऊ विभागीय शिक्षण मंडळांवरील विविध संवर्गातील रिक्त पदांवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली होती. मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व शिक्षक, माध्यमिक शाळा शिक्षक, माध्यमिक व्यवस्थापन समिती आणि कनिष्ठ महाविद्यालय व्यवस्थापन समिती या संवर्गावर केलेल्या नियुक्त्यांवर राज्यातील सरकार बदलल्यानंतर संक्रांत आली आहे.शालेय शिक्षण विभागाने मुख्याध्यापक संवर्गात पुण्यातील रमणबाग हायस्कूलच्या तिलोत्तमा रेड्डी, खेड शिवापूर येथील शिवभूमी विद्यालयाच्या विलास कोंढरे यांची तर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संवर्गात एस. व्ही. एस. ज्युनिअर कॉलेजच्या शैलजा जाधव-पॉल आणि खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयातील शरदचंद्र बोटेकर यांची नियुक्ती झाली होती. त्याचप्रमाणे माध्यमिक शिक्षक संवर्गात पेरूगेट एमईएस बॉईज हायस्कूलचे अनिल म्हस्के, सेवासदन हायस्कूलच्या मनीषा पाठक, दौंड तालुक्यातील खामगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलचे रमेश दुधाट यांची यांची आणि व्यवस्थापन समिती संवर्गात विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र निरगुडे आणि महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेचे उपकार्याध्यक्ष नारायण पाटील यांची अशासकीय सदस्य १३ सप्टेंबर २०१९ रोजी अध्यादेश प्रसिद्ध करून नियुक्ती केली होती. मात्र, या सर्व सदस्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत.पुणे विभागीय शिक्षण मंडळाच्या मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक आणि व्यवस्थापन समिती या संवर्गावर पुणे जिल्ह्यासह अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील सदस्यांच्याही नियुक्त्या केल्या होत्या. या सदस्यांच्या नियुक्त्याही रद्द केल्या असल्याचे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :PuneपुणेEducation Sectorशिक्षण क्षेत्रGovernmentसरकार