जागेचे हस्तांतर रखडले

By Admin | Updated: March 14, 2017 07:59 IST2017-03-14T07:59:41+5:302017-03-14T07:59:41+5:30

शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पिंपरी-सांडस येथील वनविभागाकडून महापालिकेला मिळणार असलेल्या जागेच्या बदल्यात त्यांना

Transfer of space | जागेचे हस्तांतर रखडले

जागेचे हस्तांतर रखडले

पुणे : शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पिंपरी-सांडस येथील
वनविभागाकडून महापालिकेला मिळणार असलेल्या जागेच्या बदल्यात त्यांना तुळापूरची जागा देण्याचा प्रस्ताव शासनदरबारी अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. शासनाकडून होत असलेल्या
या विलंबामुळे शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या
जैसे थे आहे.
शहरामध्ये दररोज १४०० टन इतका कचरा तयार होतो, त्यापैकी ६०० टन इतका कचरा उरुळी देवाची व फुरसुंगी येथील डेपोमध्ये उघड्यावर टाकला जात आहे. केंद्र शासनाच्या सप्टेंबर २००० मधील निर्देशानुसार शहरातील कचरा कुठेही उघडयावर टाकला जाऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याला १७ वर्षे उलटली तरी अद्याप या निर्देशांचे पालन पालिकेला करता आलेले नाही. याविरोधात पालिकेविरुद्ध
हरित न्यायाधिकरणामध्ये उरुळी-देवाची कचरा डेपो संघर्ष समितीच्या वतीने खटला दाखल करण्यात आलेला आहे.
उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा टाकला जाणार नाही, असे आश्वासन पुणे महापालिकेकडून वेळोवेळी देऊनही त्याचे पालन करण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कचरा प्रश्नाबाबत बैठक घेऊन हा प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र आता राज्य शासनाकडूनच यावर कार्यवाही होण्यास विलंब होत आहे.
पिंपरी-सांडस येथील वनविभागाची जागा ताब्यात घेऊन तिथे कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प पालिकेकडून उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जागा ताब्यात घेण्याकरिता २ वर्षांपासून प्रक्रिया सुरू आहे. वन विभागाकडून पालिकेला देण्यात येणाऱ्या जागेच्या बदल्यात त्यांना तुळापूर येथील जागा देण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी केंद्रीय पातळीवरून मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जागा हस्तांतराचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे ४ महिन्यांपूर्वी पाठविण्यात आला आहे. मात्र शासनाकडून अद्याप
त्याला मंजुरी देण्यात आलेली
नाही. कचरा प्रश्नावर
आंदोलन पेटल्यानंतर प्रशासनाला तेवढ्यापुरती जाग येते, त्यानंतर कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी
पुरेसे प्रयत्न प्रशासनाकडून होताना दिसत नाहीत.
(प्रतिनिधी)

Web Title: Transfer of space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.