शहरं
Join us  
Trending Stories
1
ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
2
'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
3
"मला काहून पाडलं? मह्या तोंडाला फेस येतो... माणूस पाहायचा नाही, फक्त...!'; दानवेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
4
“‘टॉयलेट मॅनर्स’ आहेत, त्यांनीच स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करावा”; रेल्वे अधिकाऱ्यांची पोस्ट चर्चेत
5
अपहरण झालेल्या चिमुकलीच्या सुटकेसाठी राप्ती सागर एक्स्प्रेस नॉन-स्टॉप २६० किमी धावली!
6
PADU Machine: "मुंबईमध्ये 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही, तर..."; राज ठाकरेंच्या संतापानंतर आयुक्त गगराणींचा खुलासा
7
उणे ४०% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अ‍ॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद
8
बिटकॉइनचा धमाका! ९६ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडून २ महिन्यांच्या उच्चांकावर; पुढे काय होईल?
9
टॅरिफचा हत्यार म्हणून वापर करणारे ट्रम्प आपल्याच देशात अडकले, पॉवेल यांच्यावरील तपास पडला भारी
10
Instagram : रील स्टार व्हायचंय? मग चुकूनही दुर्लक्षित करू नका या ५ सेटिंग्ज; व्ह्यूजचा पडेल पाऊस!
11
ICC ODI Rankings: विराट कोहली पुन्हा बनला वनडेचा किंग! हिटमॅन रोहितला बसला फटका
12
मुंबईची निवडणूक निर्णायक ठरणार, मराठी अस्मितेसह या ५ मुद्यांचं भवितव्य निश्चित करणार
13
स्पेनला १५० वर्षांनंतर मिळणार पहिली महाराणी! कोण आहे राजकुमारी लिओनोर? जिच्यासाठी बदलला गेला देशाचा कायदा
14
WPL 2026: Mumbai Indiansच्या सामन्यात दिसली Anaya Bangarची 'ग्लॅमरस' झलक, फोटोंचीही चर्चा
15
कमाल! पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे टाइमटेबल आले; कधी सुटणार, किती थांबे असणार? पाहाच
16
ना OTP, ना PIN! फक्त फिंगरप्रिंट वापरुन बँक खातं होतंय रिकामं; 'आधार स्कॅम'पासून राहा सावध
17
संसदेसह सार्वजनिक ठिकाणांवरून सावरकरांचे फोटो हटवण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालय याचिकेवर भडकलं; माजी अधिकाऱ्याला सुनावलं
18
मोठी बातमी! निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने नव्या वादाला फोडणी
19
‘भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, मनपा निवडणुकीत ही विषवल्ली कापा’, काँग्रेसचं आवाहन
20
“राहुल गांधींची प्रभू श्रीरामांवर श्रद्धा, आता अयोध्येला जाणार”; काँग्रेस नेते म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

विभागप्रमुखांकडून कागदोपत्री बदल्या

By admin | Updated: December 30, 2014 00:08 IST

विभागात ठाण मांडून बसल्याचा विषय ऐरणीवर आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी कागदोपत्री केलेल्या बदल्या प्रत्यक्षात आणण्याचे आदेश दिले होते.

पुणे : महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून बसल्याचा विषय ऐरणीवर आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी कागदोपत्री केलेल्या बदल्या प्रत्यक्षात आणण्याचे आदेश दिले होते. बहुतांश विभागप्रमुखांनी या आदेशास केराची टोपली दाखविली असून, एकानेही त्याची अंमलबजावणी केल्याचा अहवाल दिलेला नाही.पुणे मनपाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्यासंदर्भातील धोरण सर्वसाधारण सभेने काही वर्षांपूर्वी निश्चित केले आहे. मात्र, प्रत्यक्षात या धोरणाची अंमलबजावणीच होत नसल्याचे चित्र आहे. अनेक विभागांतील अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत राहिल्याने त्यांचे हितसंबंध तयार झाले आहेत. यातून मिळणारा ‘मलिदा’ लाटण्यासाठी त्यांच्याकडून बदल्यांचे आदेश प्रत्यक्षात आणले जात नाहीत. प्रशासनाने बदली केली, तरी ती कागदोपत्रीच राहते, प्रत्यक्षात ते जुन्या खात्यातच काम करीत राहतात. एखाद्या अधिकारी व कर्मचाऱ्याची बदली झाल्यानंतर त्याला लगेच विभागप्रमुखांनी कार्यमुक्त करणे आवश्यक आहे. काम एकीकडे आणि पगार दुसऱ्या खात्यातून असे अनेक प्रकार महापालिकेमध्ये सुरू आहेत. प्रसारमाध्यमातून यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी १२ डिसेंबर २०१४ पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. एकाही विभागप्रमुखांनी तो अहवाल सादर केलेला नाही. सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी महापालिका आयुक्तांच्या निदर्शनासही बाब आणून दिली. बांधकाम विभागात सर्वाधिक गोंधळ४पालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या दुसऱ्या विभागात झाल्यानंतर ते तिकडे रूजच होत नाहीत. दुसरीकडे बदली झाल्यानंतरही बांधकाम विभागातच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे.पालिकेतील किमान ५० अधिकारी बदल्या होऊनही दुसऱ्या विभागात रूजू झालेले नाहीत. ४सर्वसाधारण सभेची, अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाची पायमल्ली करणारे अधिकारी, विभागप्रमुखांवर कारवाई करण्याची मागणी सजग नागरिक मंचाच्या वतीने करण्यात आली आहे.