शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
4
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
5
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
6
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
7
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
8
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
9
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
10
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
11
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
12
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
13
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
14
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
15
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
16
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
17
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
18
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
19
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
20
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत उद्यापासुन व्यवहार होणार पूर्ववत, व्यापारी वर्गासह नागरिकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 19:09 IST

सर्वच दुकाने शासकीय अटी आणि शर्थींचे पालन करुन खुली ठेवण्यात येणार

ठळक मुद्देसकाळी ९ ते ५ या वेळेत काही अपवाद वगळता सर्व दुकाने सुरु करण्यास शासनाने परवानगी दुकानप्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंग सुविधा असणे आवश्यकहॉटेल, लॉज, सलून, शाळा, महाविद्यालय राहणार बंद

बारामती : अखेर ५५ दिवसानंतर बारामतीची बाजारपेठ फुलणार आहे. शहरात शुक्रवार (दि. २२) पासून दररोज व्यवहार सुरू होणार आहेत.त्यामुळे व्यापारी वर्गासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र,यातुन आता मात्र हॉटेल, लॉज, सलून, रेस्टॉरन्ट, शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेसना वगळण्यात आले आहे.

पुणे शहराच्या धर्तीवर रोटेशन पध्दतीने दुकाने सुरु करण्यास प्रशासनाने ११ मे पासुन परवानगी दिली होती.त्यानुसार विविध दुकानांना वार ठरवुन देण्यात आले होते. गेल्या दहा दिवसांपासुन बाजारपेठ याच तत्वावर सुरु होती. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मागणीसह जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली .नुकताच कापड आणि स्वीट होम दुकाने उघडण्याचे दिवसामध्ये मंगळवार(दि.१९) पासुन बदल करण्यात आला होता.आता मात्र   हॉटेल, लॉज, सलून, रेस्टॉरन्ट, शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस आदी वगळता इतर सर्व दुकाने ९ ते ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ऑटोमोबाईल , संगणक, ई लेक्ट्रॉनिक , रेडिमेड फर्निचर, मोबाईल शॉप, फोटो स्टुडिओ, , बॅटरि, खेळणी , फुले व पुष्पहार ,  भांडी , टेलरिंग , सोने दुकाने, रस्सी पत्रावळी , फूट वेअर, ज्वेलरी , घड्याळ , सूटकेस बॅग ,जनरल स्टोअर , सायकल , टायर , पंक्चर , स्टील ट्रेडर, स्क्रप , हार्डवेअर , बिल्डिंग मटेरियल , पेंट , कार वॉशिंग , डिजिटल प्रेस प्रिंटिंग, झेरॉक्स , मातीची भांडी दुकाने , टोपल्या आदी दुकाने सुरू ठेवण्यासाठीयापुर्वी वार ठरविण्यात आले होते. आता मात्र, सर्वच दुकाने शासकीय अटी आणि शर्थींचे पालन करुन खुली ठेवण्यात येणार आहेत. प्रशासन भवन येथे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी याबाबत व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.यावेळी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी, रमणिक मोता,सुभाष सोमाणी,स्वप्नील मुथा,शैलेश साळुंके आदी उपस्थित होते.

याबाबत ' लोकमत'शी बोलताना महासंघाचे अध्यक्ष गुजराथी यांनी सांगितले, राज्य शासनाचे मुख्य सचिव अजोय  मेहता यांनी याबाबत सुचना दिल्या आहेत.त्यानुसार सर्वत्र हा नियम लागु होणार आहे.सकाळी ९ ते ५ या वेळेत  काही अपवाद वगळता सर्व दुकाने सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.त्यानुसार सर्व व्यापारी वर्ग शासनाच्या नियमांचे पालन करणार आहे. २२ ते ३१ मे पर्यंत या पध्दतीने दुकाने सुरु राहणार आहेत. ३१ मे रोजी राज्य शासन सुधारीत आदेश देणार आहेत.त्यानंतर दुकाने सुरु ठेवण्याबाबतचे वेगळे नियोजन ठरणार आहे .

दरम्यान, एका वेळी ५ ते १०ग्राहकांना दुकानात सोडण्यात येणार आहे , दुकानप्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंग सुविधा असणे आवश्यक आहे.याशिवाय कोरोना संसर्ग रोखण्यास विविध दक्षता घेण्याच्या सूचना कायम ठेवण्यात आल्या आहेत.प्रत्येकाने मास्कचा वापर करणे, शारीरिक अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर , दुकानांमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी घेणे याशिवाय कोरोना संसर्ग रोखण्यास विविध दक्षता घेण्याच्या सूचना कायम ठेवण्यात आल्या आहेत.  नवीन निर्णयाप्रमाणे सर्व अस्थापना दैनंदिन सुरू होणार आहे.

टॅग्स :Baramatiबारामतीbusinessव्यवसायCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस