शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

गणेशोत्सवात स्वयंसेवकांचे प्रशिक्षण उपयुक्त होईल - नीलम गो-हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 22:21 IST

पुणे शहरातील गणेशोत्सव, नवरात्र निर्धोकपणे पार पडण्याकरिता स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्त्यांची मदत होईल. या करिता त्यांना प्रशिक्षित करण्यात आले असून पोलिसांना मदतीसाठी ते तयार आहेत, असे प्रतिपादन आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी आज येथे केले.

पुणे, दि. 18 -  पुणे शहरातील गणेशोत्सव, नवरात्र निर्धोकपणे पार पडण्याकरिता स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्त्यांची मदत होईल. या करिता त्यांना प्रशिक्षित करण्यात आले असून पोलिसांना मदतीसाठी ते तयार आहेत, असे प्रतिपादन आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी आज येथे केले. संस्थेच्यावतीने या उत्सवांच्या काळात पुणे शहरात स्वयंसेवक नेमण्यात येतात. त्यांचे काम अधिक चांगल्या रीतीने होण्यासाठी त्यांना हे प्रशिक्षण देण्यात येते.  हा गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा अशी अपेक्षादेखील यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली.आपत्तीच्या वेळी फोटो काढण्याऐवजी मदत करावी. कोणत्याही अनोळखी, आकस्मिक ठिकाणी सेल्फी न घेता अशा अनावश्यक सेल्फींचा मोह टाळावा. या काळात पावसाळी वातावरणात सुरक्षित पणे वावरून ठिकठिकाणी असलेल्या उघडया तारांपासून दूर रहावे. महिलांनी गर्दीच्या ठिकाणी मोबाइलचा अनावश्यक वापर टाऴावा. कोणत्याही दुर्दैवी घटनेच्या वेळी एखाद्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक लागत नाही तर घाबरून जाऊ नये, अशा वेळी मोबाईलवर  साधा संदेश अथवा संपर्क करण्यासाठी दूरध्वनीचा वापर केल्यास मनातील भीती आणि काळजी सहज दूर होते. स्वयंसेवकांनी उत्सवांच्या काळात आपल्या भागातील परिस्थितीचा आढावा घ्यावा, आवश्यक प्रसंगी संस्थेशी संपर्क करावा.मुंबईतील सर्व पोलीस स्टेशनच्या अधिका-यांना महिला कायद्यांबाबत संवेदनशीलता वाढविण्याकरिता प्रशिक्षित करण्यात मुंबई पोलीस उपायुक्त श्री. दीपक देवराज यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे  गो-हे यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. यावेळी पुणे शहर अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे यांनी सुरक्षितता विषयावर माहिती दिली. येत्या २३ ऑगस्ट रोजी संस्थेत सकाळी ११ ते २ या वेळेत या प्रशिक्षित स्वयंसेवकांना ओळखपत्र वितरण करण्याचा कार्यक्रम होईल. ज्यांचे प्रशिक्षण झाले आहे अशाच महिलांना ही ओळखपत्रे देण्यात येतील. त्या अनुषंगाने केंद्राच्या कार्यालयात ज्योती कोटकर, अनिता शिंदे, विभावरी कांबळे, शेलार गुरुजी आणि अश्विनी शिंदे यांची समिती तयार करण्यात आली आहे. स्वयंसेवकांनी त्यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.