शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंसेवकांना बॉँबशोधक पथकाकडून प्रशिक्षण : पोलीस आयुक्त डॉ़. के़. व्यंकटेशम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 22:13 IST

समाजकंटकांनी अशांतता निर्माण करु नये, यासाठी सुरक्षेची काळजी घेण्याचे काम पोलीस करतात.

ठळक मुद्देगणेशेत्सवात केवळ पोलीसांवर अवलंबून राहून नका

पुणे : गणेशोत्सव जनतेचा उत्सव आहे़ त्यामुळे  केवळ पोलिसांवर अवलंबून राहता येणार नाही़ कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी  गणेश मंडळांचे कार्यकर्ते, सर्वसामान्यांचे सहकार्य, मार्गदर्शन आवश्यक आहे़  लोकांनी  एकमेकांना ओळखले पाहिजे़ शहरातील सर्व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमधून काही जणांना स्वयंसेवक म्हणून सुरक्षेबाबत काय काळजी घ्यावी, याचे प्रशिक्षण बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून देण्यात येत आहे़ त्यांना मंडळाचा मंडप व परिसराची सुरक्षेच्या दृष्टीने कशी काळजी घेतली पाहिजे, याचे मार्गदर्शन व्हिडिओ व अन्य साहित्यांद्वारे दिले असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी संवाद साधताना पोलीस आयुक्त म्हणाले, गणेशोत्सव  जनतेमध्ये उत्साह आणि चैतन्य निर्माण करतो़. उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करता यावा, यासाठी पोलीस आपले काम करीत आहेत़ हा  उत्सव निर्विघ्न पार पाडावा, यासाठी पोलीस काही गोष्टींवर नियंत्रण आणत असतात़. त्याला जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे.  गणेशोत्सवात मंडळांचे देखावे, आरास पाहण्यासाठी दूरदूरहून भाविक येत असतात़ या गर्दीवर नियंत्रण आणणे,  समाजकंटकांनी अशांतता निर्माण करु नये, यासाठी सुरक्षेची काळजी घेण्याचे काम पोलीस करतात. भाविकांना देखावे पाहण्यास त्रास होऊ नये, यासाठी अनेक रस्त्यांवर वाहतूक शाखेकडून निर्बंध आणले जातात़. त्यांना नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असते़ त्यामुळे ज्या रस्त्यावर निर्बंध घातले आहेत़ त्याचे पालन केले पाहिजे़. गणेशोत्सवात अनेक लोक आजारी, ज्येष्ठ नागरिकही असतात़ त्यांना ध्वनी प्रदुषणाचा त्रास होत असतो़. त्यांची काळजी घेणो सर्वांचेच काम आहे़. उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदुषणाबाबत जे निर्बंध घालून दिले आहेत, त्याचे मंडळांनी जागरुकतेने पालन करण्याची आवश्यकता आहे़. पोलिसांच्या विनंतीला  मान देऊन अनेक मंडळांनी सीसीटीव्ही लावले आहेत़. त्याद्वारे देखरेख करण्यात येत आहे़ विसर्जन मिरवणूक थांबल्याने एकाच ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता असते़. विशेषत: बेलबाग चौक,टिळक चौक येथे गर्दीचे प्रमाण सर्वाधिक असते़  दर्शन घेतल्यानंतर मागून येणाºयांना संधी दिली पाहिजे़.गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून पोलिसांचे प्रयत्न सुुरु आहे़. अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे़. तसेच विसर्जन मिरवणुकीत साध्या वेशातील पोलीस मोठ्या संख्येने असणार आहेत़. ते अशा चोरट्यांवर लक्ष ठेवून असणार आहे़. नागरिकांनाही काही संशयास्पद आढळले तर त्यांनी जवळ असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना सांगावे अथवा पोलीस नियंत्रण कक्षाला कळवावे़, असे आवाहन डॉ. व्यंकेटेशम यांनी केले. 

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवPoliceपोलिस