आॅनलाइन अर्ज भरण्याचे प्रशिक्षण
By Admin | Updated: January 23, 2017 03:23 IST2017-01-23T03:23:38+5:302017-01-23T03:23:38+5:30
आगामी महापालिका निवडणुकीसाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावायचे आहेत. यासाठी आज (२३ जानेवारी) बालगंधर्व

आॅनलाइन अर्ज भरण्याचे प्रशिक्षण
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावायचे आहेत. यासाठी आज (२३ जानेवारी) बालगंधर्व रंगमंदिर येथे या संपूर्ण प्रक्रियेची माहिती देण्यासाठी सकाळी दहा वाजता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, इच्छुक उमेदवार, सायबर कॅफेचालक, नागरी सुविधा केंद्रांचे प्रतिनिधी यांना या शिबिरासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्याचबरोबर नागरिकांना याविषयी जाणून घ्यायचे, त्यांनीही याला उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी यंदा पहिल्यांदाच आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया सर्वांसाठी नवीन आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून याची माहिती दिली जाणार आहे. मुख्य निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ, आॅनलाइन संगणकप्रणाली, नामनिर्देशपत्रासोबत सादर करावयाची कागदपत्रे अपलोड करणे, निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करणे आदींची माहिती या वेळी दिली जाणार आहे.
प्रशिक्षणास उमेदवारांना आॅनलाइन पद्धतीने नामनिर्देशनपत्र सादर करताना माहिती तंत्रज्ञान विषयक सर्व तांत्रिक सुविधा सुलभ व सहजपणे उपलब्ध होण्याकरिता शहरातील इंटरनेट कॅफेचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे इंटरनेट कॅफेचालक/ मालक यांनाही नामनिर्देशनपत्र आॅनलाइन पद्धतीने भरण्याच्या प्रशिक्षण शिबिरासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. संगणकाचे चांगले ज्ञान असणारे प्रतिनिधी राजकीय पक्षांनी या शिबिरासाठी पाठवावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.