शेतीसंदर्भातील ॲपचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:25 IST2021-09-02T04:25:34+5:302021-09-02T04:25:34+5:30
ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यक्रम अंतर्गत पडवी येथे (ता. दौंड, जि. पुणे) गावातील शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ ...

शेतीसंदर्भातील ॲपचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण
ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यक्रम अंतर्गत पडवी येथे (ता. दौंड, जि. पुणे) गावातील शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, अंतर्गत राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या वतीने प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात आला. कोरोनाच्या काळातील मार्गदर्शन तत्त्वाचे पालन करीत कृषी प्रात्यक्षिकाचे आयोजन केले. या वेळी वाघमारे यांनी याबरोबर मातीपरीक्षण कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. या वेळी माहिती चार्ट आणि व्हिडीओच्या साहाय्याने विविध कृषिसंदर्भातील नियोजनाचे प्रात्यक्षिक दाखविले. या वेळी केंद्रप्रमुख डॉ. ए. ए. पिसाळ, समन्वक डॉ. बी. टी. कोलगणे, कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. एस. मोटे यांचे मार्गदर्शन लाभले.
या वेळी शेतकरी नामदेव सोनावणे, विकास काळे, वसंत निंबाळकर, गौरव रणधीर, निखिल काळे, कांचन सोनावणे, पंकज शेलार आदी शेतकरी उपस्थित होते.
--