पूर्ववैमनस्यातून दोन कुटुंबांत हाणामारी

By Admin | Updated: October 16, 2016 03:50 IST2016-10-16T03:50:53+5:302016-10-16T03:50:53+5:30

येथील निंबाळकरवस्तीत पूर्ववैमनस्यातून मनात राग धरून दोन कुटुंबामध्ये जोरदार हाणामारी झाली. दोघांनीही पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत.

The tragedy of two families in Pre-demise | पूर्ववैमनस्यातून दोन कुटुंबांत हाणामारी

पूर्ववैमनस्यातून दोन कुटुंबांत हाणामारी

लासुर्णे : येथील निंबाळकरवस्तीत पूर्ववैमनस्यातून मनात राग धरून दोन कुटुंबामध्ये जोरदार हाणामारी झाली. दोघांनीही पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत.
वालचंदनगर पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार सुजाता मोहन निंबाळकर यांचा मुलगा मेघराज मोेहन निंबाळकर हा रायबा सोपना नानेकर यांच्या घरासमोरील स्वत:च्या शेतातील मोटार सुरू करण्यास गेला असता, कल्याण रायबा नानेकर, अरविंद रायबा नानेकर यांनी मेघराज यास सायकलच्या चेनने बेदम मारहाण केली. तसेच सुजाता निंबाळकर, मोहन निंबाळकर, त्यांची मुले मेघराज व प्रणव यांच्यावर चाकूने वार केले. याबाबत कल्याण रायबा नानेकर व अरविंद रायबा नानेकर, रायबा सोपान नानेकर, अनिता रायबा नानेकर, राधिका रायबा नानेकर, ताई सोपान नानेकर, रवी बबन जाधव, संतोष बबन जाधव, रंजना गव्हाणे आदींच्या विरोधात सुजाता मोेहन निंबाळकर यांनी तक्रार दिली आहे.
अनिता रायबा नानेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सकाळी साडेसहाच्यादरम्यान मेघराज मोहन निंबाळकर व विनायक विठ्ठल यादव यांनी मोटारसायकलवरून येऊन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याबाबत मेघराज मोहन निंबाळकर, विनायक विठ्ठल यादव, मंजुळा निवृत्ती निंबाळकर, प्रताप माणिक निंबाळकर, अंजना विठ्ठल यादव, तुकाराम विठ्ठल यादव, पवन मोहन निंबाळकर, मोहन बाबूराव निंबाळकर, अक्षय बाळासोा घाडगे, सुजाता मोहन निंबाळकर, निखिल निवृत्ती निंबाळकर, चंद्रकांत निंबाळकर बाळासोा घाडगे (पूर्ण नाव माहीत नाही) आदींच्या विरोधात तक्रार दिली आहे.

या प्रकरणात सुजाता मोहन निंबाळकर या महिलेने अनिता रायबा नानेकर व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींविरुद्ध दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये शनिवारी (दि. १५) सकाळी आठ वाजता रवी बबन जाधव, संतोष बबन जाधव, रंजना गव्हाणे व इतर अनोळखींनी घरी येऊन शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा उल्लेख आहे. मात्र या वेळी हे दोघे जण मारहाणीतील जखमींना औषधोपचारासाठी इंदापूर येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात घेऊन आले होते. रुग्णालयात त्यांनी त्या वेळी मोबाईल कॅमेऱ्याने चित्रीकरणही केलेले आहे. इंदापूरमधील पत्रकारांची भेटही त्यांनी घेतली. सर्व प्रकरणाची माहिती दिली. एकाच वेळी हे दोघे दोन वेगवेगळ्या ठिकाणी कसे असू शकतात, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: The tragedy of two families in Pre-demise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.