शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिस निलंबित, दुकानदाराशी संगनमत करणे पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 23:26 IST

ही घटना नळस्टॉप चौकात ४ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली होती.

पुणे: दुचाकीवरुन जाणाऱ्या महिलेला अडवून तिला दुकानदाराला फोन पेवर पैसे पाठवून त्याच्याकडून पैसे घेणे वाहतूक पोलिसाला महाग पडले असून पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी त्याला मंगळवारी रात्री निलंबित केले आहे. संग्राम लक्ष्मण पवार हे या पोलिस शिपायाचे नाव असून सध्या तो कोथरुड वाहतूक शाखेत कार्यरत होता. ही घटना नळस्टॉप चौकात ४ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली होती.

संग्राम पवार हा नळस्टॉप चौकात नेमणूकीला होता. दुचाकीवरुन जाणार्या महिलाला थांबविले. तिच्याकडे एनओसी मागून १० हजार रुपये दंड होईल, असे सांगितले. या महिलेने दंड भरण्यास असमर्थता दाखविल्यावर तिच्याकडे १ हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी तिने काही कमी करा, असे म्हटल्यावर त्याने ५०० रुपये मागितले. तिने फोन पेने पैसे घेण्यास सांगितले. तेव्हा त्याने समोरील न्यू इंद्रप्रस्थ मिनी मार्केटमधील क्यु आर कोड वर ५०० रुपये स्कॅन करुन कॅश आणून देण्यास सांगितले.

त्या दुकानात गेल्यावर त्या दुकानदाराने ५२० रुपये फोन पेवर स्कॅन करावे लागतील, असे सांगितले. त्याप्रमाणे दुकानातील फोन पेवर या महिलेने ५२० रुपये दिले आणि दुकानदाराकडून ५०० रुपये घेऊन ते संग्राम पवार याला दिले. याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी संग्राम पवार याला निलंबित केले.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणPuneपुणे