वाहतूक पोलीस करणार ‘अचानक’ वाहनतपासणी
By Admin | Updated: November 17, 2016 04:30 IST2016-11-17T04:30:36+5:302016-11-17T04:30:36+5:30
शहरातील वाहतूकसमस्या आणि बेशिस्त वाहनचालकांना चाप लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी एक विशेष मोहीम हाती घेतली असून

वाहतूक पोलीस करणार ‘अचानक’ वाहनतपासणी
पुणे : शहरातील वाहतूकसमस्या आणि बेशिस्त वाहनचालकांना चाप लावण्यासाठी वाहतूक पोलिसांनी एक विशेष मोहीम हाती घेतली असून, ‘अचानक’पणे केव्हाही आणि कुठेही वाहतूक पोलीस वाहन तपासणी करणार आहेत. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहनचालकांवर या मोहिमेदरम्यान विशेष लक्ष राहणार असून, दंड वसुलीही जोरदार केली जाणार आहे.
वाहतूक नियमभंगामुळे गंभीर आणि किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे.