वाहतूक पोलिसांचे आॅपरेशन ‘अचानक’
By Admin | Updated: September 24, 2014 05:55 IST2014-09-24T05:55:06+5:302014-09-24T05:55:06+5:30
वाहतूक पोलिसांनी फर्ग्युसन रस्ता, टिळक चौक, खंडोजीबाबा चौक याठिकाणी अचानक वाहनांची तपासणी मोहीम हाती घेऊन नियमभंग करणा-या २२०० वाहनचालकांवर कारवाई केली

वाहतूक पोलिसांचे आॅपरेशन ‘अचानक’
पुणे : वाहतूक पोलिसांनी फर्ग्युसन रस्ता, टिळक चौक, खंडोजीबाबा चौक याठिकाणी अचानक वाहनांची तपासणी मोहीम हाती घेऊन नियमभंग करणा-या २२०० वाहनचालकांवर कारवाई केली. हेल्मेट न घालणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, सिग्नल तोडणे, लायसन्स जवळ न बाळगणे, नो-एंट्री, सीटबेल्ट न लावणे, ट्रिपलसीट, फॅन्सी नंबरप्लेट असे सर्व प्रकारचे नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांच्या सूचनेनुसार विशेष पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली. वाहतूक शाखेकडील ८ पोलीस निरीक्षक, १६ सहायक पोलीस निरीक्षक व १४० पोलीस कर्मचारी यांनी यामध्ये सहभाग घेतला.
हेल्मेट न वापरणाऱ्या ८३, झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करणे - ९१, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे - ४, सिग्नल तोडणे -२६, विना लायसन्स - ३, लायसन्स जवळ न बाळगणे - ८२, नंबरप्लेट नाही - ९, विना गणवेश - ११५, नो-एंट्री - ७७, बॅच नाही - १५, सीटबेल्ट न लावणे - १३४, ओपन फाळका - ८, वाहनाची कागदपत्रे जवळ न बाळगणे - ४७, रहदारीस अडथळा करणे - १०, ट्रिपल सीट - २६, फॅन्सी नंबरप्लेट - १६३ अशा वाहनांवर कारवाई करण्यात आली.
त्याचबरोबर वाहतूक शाखा परिमंडळ-४ मार्फत विमानतळ परिसरात विशेष मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्या ५७५ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)