धायरी फाटा येथे वाहतूक पोलीस नेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:20 IST2021-02-05T05:20:53+5:302021-02-05T05:20:53+5:30

धायरी : वडगाव खुर्द येथील धायरी फाटा परिसरात सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच या परिसरात ...

Traffic police at Dhayari Fata | धायरी फाटा येथे वाहतूक पोलीस नेमा

धायरी फाटा येथे वाहतूक पोलीस नेमा

धायरी : वडगाव खुर्द येथील धायरी फाटा परिसरात सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेच या परिसरात नारायणराव सणस विद्यालय असल्याने विद्यार्थ्यांची देखील ये-जा असते. अशा परिस्थितीत येथील बेशिस्त रिक्षाचालक व वाहनचालकांमुळे येथे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस कर्मचारी नेमण्याची मागणी नगरसेविका राजश्री नवले यांनी सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांच्याकडे केली आहे.

धायरी फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा त्रास होत असल्याने या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नेमण्यात यावा. यासाठी सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार शेळके यांना निवेदन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप नवले उपस्थित होते. धायरी फाटा परिसरात वाहतूक पोलीस कर्मचारी नेमण्यात येईल, असे आश्वासन नंदकिशोर शेळके यांनी दिल्याचे नगरसेविका राजश्री नवले यांनी सांगितले.

फोटो ओळ : वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांना निवेदन देताना नगरसेविका राजश्री नवले व दिलीप नवले.

Web Title: Traffic police at Dhayari Fata