शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांकडून महिन्यात कोटीची वसुली, ३० हजारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 04:12 IST

वाहतूक नियम मोडणाºया वाहनचालकांवर डिव्हाईसच्या माध्यमातून कारवाई करूनही ज्यांनी दंड भरला नाही, अशा वाहनचालकांवर वाहतूक शाखेकडून नाकाबंदी करून दंड वसूल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ गेल्या ६ फेबु्रवारीपासून सुरू केलेल्या या मोहिमेत महिनाभरात सुमारे १ कोटी रुपयांचा दंड आतापर्यंत वसूल करण्यात आला आहे. 

पुणे - वाहतूक नियम मोडणाºया वाहनचालकांवर डिव्हाईसच्या माध्यमातून कारवाई करूनही ज्यांनी दंड भरला नाही, अशा वाहनचालकांवर वाहतूक शाखेकडून नाकाबंदी करून दंड वसूल करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ गेल्या ६ फेबु्रवारीपासून सुरू केलेल्या या मोहिमेत महिनाभरात सुमारे १ कोटी रुपयांचा दंड आतापर्यंत वसूल करण्यात आला आहे. वाहतूक नियम मोडणाºया वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूक शाखेकडून दंडआकारणी केली जात असून, गेल्या वर्षभरात अशा ६ लाख ७३ हजार ९९२ जणांवर सीसीटीव्ही आणि डिव्हाईसच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली.या वाहनचालकांना एसएमएस पाठविला व दंड भरण्यास सांगण्यात आले होते़ तरीही अनेकांनी या मेसेजकडे दुर्लक्ष केले़ त्यामुळे वाहतूक शाखेकडे दंडआकारणी करूनही प्रत्यक्षात दंडवसुली होत नसल्याचे दिसून येत होते़ त्यामुळे ज्या वाहनचालकांनी हा दंड भरलेला नाही अशा वाहनाचालकांची नाकाबंदीत तपासणी करून त्यांच्याकडून दंडवसुली केली जात आहे़अशी केली जाते दंडवसुलीवाहतूक शाखेच्या वतीने दररोज २ तास शहरातील विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येते़ वाहतूक पोलिसांना एक मोबाईल अ‍ॅप देण्यात आले आहे़ त्यावर वाहनाचा नंबर टाकल्यावर त्या वाहनावर काही कारवाई केली असेल, तर त्याची माहिती येते़ त्यात चलन नंबर, कधी, कोठे व केव्हा नियमभंग केला, कोणता नियम तोडला आणि त्याला किती दंड आहे, याची माहिती येते़ त्याबरोबर फोटोही येतो़ याशिवाय या दंडाची रक्कम भरली आहे की नाही, याचीही माहिती त्यासोबत मिळते़ तसेच, अशा प्रकारे गेल्या वर्षभरात एकापेक्षा अधिक वेळा नियमभंग केला असेल तर त्याचीही माहिती त्यावर दिसते़ त्यानुसार पोलीस वाहनचालकांवर कारवाई करीत आहेत़ वाहतूक पोलिसांच्या वेबसाईटवरही हे अ‍ॅप असून त्यावर आपल्या वाहनाचा नंबर टाकल्यास कारवाई केली आहे की नाही, त्याची माहिती मिळते.गेल्या ६ फेबु्रवारीपासून वाहतूक पोलिसांनी ही मोहीम सुरू केली असून ४ मार्चअखेरपर्यंत तब्बल ३० हजार १८४ वाहनचालकांकडून ९५ लाख २८ हजार ५० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे़ नव्या वर्षात ई-चलानाद्वारे दंडआकारणी केलेल्या ५३ हजारांहून अधिक वाहनचालकांकडून दंडवसुली करण्यात आली असून, वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, यासाठी ही मोहीम सुरू केली आहे़- अशोक मोराळे,पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा़ 

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीस