ट्रॅफिकॉप आता गुन्हे शाखेच्या पोलिसांनाही

By Admin | Updated: September 20, 2015 00:37 IST2015-09-20T00:37:53+5:302015-09-20T00:37:53+5:30

पोलिसांसाठी तयार करण्यात आलेल्या ट्रॅफिकॉप नाकाबंदी सॉफ्टवेअरचा वापर आता वाहतूक पोलिसांसोबत आता गुन्हे शाखेचे पोलीसही वापर करू शकणार आहेत.

Traffic-Now, crime branch police too | ट्रॅफिकॉप आता गुन्हे शाखेच्या पोलिसांनाही

ट्रॅफिकॉप आता गुन्हे शाखेच्या पोलिसांनाही

पुणे : पोलिसांसाठी तयार करण्यात आलेल्या ट्रॅफिकॉप नाकाबंदी सॉफ्टवेअरचा वापर आता वाहतूक पोलिसांसोबत आता गुन्हे शाखेचे पोलीसही वापर करू शकणार आहेत. वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपासासाठी, तसेच सोनसाखळी चोरी, दरोडे आणि चोऱ्यांच्या गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या वाहनांच्या तपासासाठी सॉफ्टवेअरचा उपयोग होणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त पी. आर. पाटील यांनी दिली.
सायन्स अ‍ॅन्ड टेक्नोलॉजी पार्कचे नितीन शरद वैद्य यांनी हे सॉफ्टवेअर विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे. गुन्हे शाखेच्या एकूण १२५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर हे सॉफ्टवेअर देण्यात आले आहे. त्यामुळे एका क्लिकवर माहिती मिळणार आहे. वाहनचालकाचे नाव, पत्ता, वाहनाचा नोंद क्रमांक व गाडीचा प्रकार (मेक) याबाबतची माहिती तातडीने उपलब्ध होणार असल्यामुळे गुन्ह्यांच्या तपासासाठी मदत मिळणार आहे. आरटीओकडून माहिती मिळवण्यामध्ये जात असलेला वेळ त्यामुळे वाचणार आहे.

Web Title: Traffic-Now, crime branch police too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.