वाहतूकदारांना शुल्कवाढीचा फटका

By Admin | Updated: February 14, 2017 02:11 IST2017-02-14T02:11:27+5:302017-02-14T02:11:27+5:30

प्रभाग क्रमांक ४० चे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शंकरराव बेलदरे-पाटील, युवराज बेलदरे, अमृता अजित बाबर व स्मिता सुधीर कोंढरे यांच्या

Traffic losses to the traffic officers | वाहतूकदारांना शुल्कवाढीचा फटका

वाहतूकदारांना शुल्कवाढीचा फटका

कात्रज : प्रभाग क्रमांक ४० चे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शंकरराव बेलदरे-पाटील, युवराज बेलदरे, अमृता अजित बाबर व स्मिता सुधीर कोंढरे यांच्या प्रचारार्थ निघालेल्या पदयात्रेमध्ये महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व भारती परिवाराचे अध्यक्ष बाबा शिंंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पाठिंंबा देत राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार बहुमतांनी निवडुन आणण्याचा निर्धार केला.
राज्य व केंद्र सरकारने परिवहन शुल्कामध्ये केलेल्या प्रचंड वाढीमुळे राज्यातील वाहतूकदार प्रचंड तणावाखाली असून याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे.त्यामुळे रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक वाहतूकदारांची शिवसेना व भाजप सरकारवर नाराजी आहे. त्यामुळे या मनपा निवडणुकीमध्ये सरकारला घरचा रस्ता दाखवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन शिंंदे यांनी केले.
या प्रभागात गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाली. त्यामुळे पक्षाच्या उमेदवारांचा निसटता पराभव झाला. मात्र यावेळी नमेश बाबर यांनी योग्य नियोजन करत राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यकर्त्यांचा समन्वय घडवून आणला. त्यामुळे सर्वच निष्ठावान कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांची प्रचार यंत्रणाच आपल्या हाती घेतल्याने राष्ट्रवादी पॅनलला अधिक बळकटी मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले. पॅनल निवडताना विचारात घेतलेली समिकरणे, सक्षम, शिक्षित व अनुभवी उमेदवार आणि सर्वच भागांना दिलेली संधी दिल्याचे ते म्हणाले.
(वार्ताहर)

Web Title: Traffic losses to the traffic officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.