वरंध घाटात पडलेल्या दरडीमुळे कोकणात जाणारी वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:31 IST2021-01-08T04:31:54+5:302021-01-08T04:31:54+5:30
भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाटात महाड बाजूकडील वळणावर पावसाळ्यात संरक्षक भिंत पडली आहे. सदरची दरड मागील चार महिने आहे तशीच ...

वरंध घाटात पडलेल्या दरडीमुळे कोकणात जाणारी वाहतूक ठप्प
भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाटात महाड बाजूकडील वळणावर पावसाळ्यात संरक्षक भिंत पडली आहे. सदरची दरड मागील चार महिने आहे तशीच आहे, त्यामुळे अवघड वळणावरचा रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे सदर रस्त्यावरून लहान चारचाकी गाड्या जातात, मोठ्या गाड्या जात नाहीत. दरडी काढून काम करणे गरजेचे आहे. मात्र, महाड बांधकाम विभागाकडून काम सुरू करण्यात आलेले नाही.
दरम्यान, काल रात्री १० वाजता सदर रस्त्याने बाराचाकी माल वाहतूक गाडी भोरवरून महाडला जात होती, मात्र घाटात पडलेल्या दरडीमुळे सदरची गाडी वळणावरच अडकली त्यामुळे वाहतूक बंद झाली होती पोलीस प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाने क्रेन बोलावून पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गाडी बाजूला करून रस्ता सुरळीत करण्यात आला.
घाटात संरक्षक भिंतीची पडलेली दरड मागील चार महिने काढलेली नाही. त्यामुळे वाहनचालकांच्या माहितीसाठी भोर आणी महाड बाजूकडे सूचना फलक लावणे गरजेचे आहे, मात्र फलक नसल्यामुळे दोन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी एक ट्रेलर अडकला होता. त्यामुळे महाड बांधकाम विभागाने लवकरात लवकर काम सुरू करण्याची मागणी नागरिक करीत आहे. संरक्षक भिंतीचे काम झाले नसल्याने महाड व पर्यायाने कोकणात जाणारी वाहतूक ठप्प आहे.