शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

कर्वेरस्त्यावर वाहतूक काेंडी, मेट्राेच्या कामासाठी बंद केल्या लेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 18:50 IST

दुहेरी उड्डाणपुलाच्या कामासाठी अभिनव चौक ते पादचारी पुलापर्यंतच्या रस्त्यावरील दोन्ही बाजूकडील एक लेन बंद करण्यात आल्याने शनिवारी कर्वे रस्त्यावर दुपारी वाहतुक कोंडी झाली.

पुणे : दुहेरी उड्डाणपुलाच्या कामासाठी अभिनव चौक ते पादचारी पुलापर्यंतच्या रस्त्यावरील दोन्ही बाजूकडील एक लेन बंद करण्यात आल्याने शनिवारी कर्वे रस्त्यावर दुपारी वाहतुक कोंडी झाली. वाहतुक पोलिसांनी कोंडीची चाचपणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर या लेन बंद केल्या होत्या. सायंकाळी बॅरिकेडिंग काढल्यानंतर वाहतुक सुरळीत झाली. या प्रयोगामुळे मात्र संपुर्ण कर्वे रस्ता वाहतुक कोंडीमुळे गुदमरून गेला.

    कर्वे रस्त्यावर मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. या कामासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकापासून नळस्टॉप चॉकापर्यंत मेट्रोचे खांब उभारले जात आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूची एक लेन बंद करण्यात आली आहे. आता नळस्टॉप चौक ते  स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलापर्यंतचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे वाहतुक पोलिस व महामेट्रोकडून वाहतुक कोंडीची चाचपणी केली जात आहे. शनिवारी दुपारी अभिनव चौक ते एसएनडीटी विद्यापीठासमोरील पादचारी पुलापर्यंतच्या रस्त्यावर दोन्ही बाजुने एक लेन बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आली. दोन्ही बाजुचा पाच ते सात मीटर रस्ता वाहनांसाठी खुला होता. यावेळी नळस्टॉप चौकातील सिग्नल यंत्रणा बंद करण्यात आली. 

    या प्रयोगाला सुरूवात झाल्यानंतर काही वेळातच अभिनव चौकात वाहतुक कोंडी झाली. चौकातून कर्वेनगरच्या दिशेने जाणारी आणि पौड रस्त्यावरून चौकाकडून येणारी वाहतुक संथ झाल्याने मागील बाजुच्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. डेक्कन बाजुने अभिनव चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सावरकर स्मारकापर्यंत आणि पौड फाटा ते गरवारे महाविद्यालय चौकापर्यंत वाहतुक कोंडी झाली. दोन्ही बाजुने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने लगतच्या विधी महाविद्यालय रस्ता, कॅनॉल रस्ता, नळस्टॉप ते म्हात्रे पुल तसेच इतर रस्यांवरही कोंडी झाली. ही कोंडी फोडताना वाहतुक पोलिसांची दमछाक झाली. दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास बॅरिकेड्स काढून संपुर्ण रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर काही वेळात वाहतुक कोंडी कमी झाली. 

रविवारी चक्रकार वाहतूक शनिवारी अभिनव चौक ते पादचारी पुलापर्यंतची एक लेन बंद करण्याचा प्रयोग केल्यानंतर रविवारी चक्राकार वाहतुकीचा प्रयोग राबविला जाणार आहे. पौड रस्त्याने येणारी वाहतुुक एसएनडीटी विद्यापीठासमोरून आठवले चौकाकडे वळविली जाईल. या चौकातून डेक्कनच्या दिशेने जाणारी वाहने उजवीकडे वळून अभिनव चौकात येतील. मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर या चौकातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी या दोन पर्यांयांचा विचार केला जात आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे वाहतुक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसPuneपुणे