नेटक्या संयोजनामुळे वाहतूक प्रवाही
By Admin | Updated: September 26, 2016 01:21 IST2016-09-26T01:21:21+5:302016-09-26T01:21:21+5:30
नेटक्या संयोजनामुळे, वाहतूक नियंत्रण करणाऱ्या स्वयंसेवकांमुळे सकाळी दुचाकी, चारचाकी वाहनांवरून मोर्चासाठी मध्यवर्ती शहराकडे येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही

नेटक्या संयोजनामुळे वाहतूक प्रवाही
पुणे : नेटक्या संयोजनामुळे, वाहतूक नियंत्रण करणाऱ्या स्वयंसेवकांमुळे सकाळी दुचाकी, चारचाकी वाहनांवरून मोर्चासाठी मध्यवर्ती शहराकडे येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही अडचणीविना जलदगतीने मोर्चाच्या ठिकाणी पोहोचणे शक्य झाले. ठिकठिकाणी स्वयंसेवकांनी वाहतुकीचे स्वत:च नियंत्रण केल्यामुळे पोलीस निवांतपणे बाजूला उभे राहून थांबल्याचे दृश्य दिसत होते. सकाळी दहाच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील अंतर्गत वसाहतींकडून येणाऱ्या वाहनचालकांना थांबवून धरून मुख्य रस्त्यावरील वाहतूक प्रवाही ठेवल्यामुळे मध्यवर्ती शहरात पोचणे सुविधेचे झाले. लाल दिवा असतानाही पोलीस व स्वयंसेवक मोर्चासाठी जाणाऱ्यांना पुढे जाऊ देत होते.
टिळक चौकाच्या अलीकडे वाहने उभी करून संभाजीमहाराज पुतळ्याकडे जाऊ इच्छिणाऱ्यांना पोलीस व स्वयंसेवकांनी अडविले. त्यामुळे पूना हॉस्पिटलसमोरील रस्त्याने जोशी पुलाकडे चालत मराठा बांधव पुलाच्या पायऱ्या उतरून नदीपात्रामध्ये गेले. तेथून टिळक चौकातून मोर्चात सहभागी झाले.