माळेगाव रस्त्यावर वाहतूककोंडी
By Admin | Updated: November 9, 2015 01:35 IST2015-11-09T01:35:22+5:302015-11-09T01:35:22+5:30
माळेगावच्या कृषी प्रदर्शनासाठी शनिवारी (दि. ७) सकाळी १ वाजता माळेगाव रस्त्यावर मोठी गर्दी उसळली. अपुरे पोलीस कर्मचारी, उदासीन प्रशासन आणि नियोजनाच्या अभावाचा मोठा

माळेगाव रस्त्यावर वाहतूककोंडी
बारामती : माळेगावच्या कृषी प्रदर्शनासाठी शनिवारी (दि. ७) सकाळी १ वाजता माळेगाव रस्त्यावर मोठी गर्दी उसळली. अपुरे पोलीस कर्मचारी, उदासीन प्रशासन आणि नियोजनाच्या अभावाचा मोठा फटका वाहतुकीला बसला. त्यामुळे हजारो वाहने या रस्त्यावर एक तासाहून अधिक काळ अडकली होती.
माळेगाव रस्त्यावरील म्हसोबा मंदिरापासून वाहतूककोंडीला सुरुवात झाली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही कोंडी दुपारी उशिरापर्यंत कायम होती. अरुंद रस्त्यावर प्रदर्शन पाहण्यासाठी अचानक वाहनांची संख्या वाढली. या वाहनांचे व्यवस्थापन वेळेत झाले नाही. त्यामुळे वाढत्या गर्दीचे वाहतुकीच्या कोंडीत रूपांतर झाले.
1या शेतकऱ्यांचा बराचसा वेळ वाहतूककोंडीमुळे वाया गेला. त्यामुळे पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाबाबत या शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.2वाहतुकीमध्ये अडकलेले काही पोलीस कर्मचारीदेखील होते. मात्र, कोंडी दूर करण्याऐवजी तेच वाट काढताना दिसत होते. कृषी प्रदर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता, वाहतूकीचे नियोजन करणे गरजेचे होते. 3यामध्ये मात्र पोलीस, आयोजक कमी पडल्याचे चित्र होते. त्यामुळे शेतकऱ्यांना बराचसा वेळ रस्त्यावर काढावा लागला. तसेच, मनस्तापही सहन करावा लागला. 4अरुंद रस्त्यावर प्रदर्शन पाहण्यासाठी अचानक वाहनांची संख्या वाढली. या वाहनांचे व्यवस्थापन वेळेत झाले नाही.