तीन तास वाहतूक विस्कळीत

By Admin | Updated: June 13, 2015 04:38 IST2015-06-13T04:38:48+5:302015-06-13T04:38:48+5:30

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावर गोल फि रत दुभाजकावरून विरुद्ध लेनवर गेल्याने झालेल्या अपघातानंतर

Traffic disrupted for three hours | तीन तास वाहतूक विस्कळीत

तीन तास वाहतूक विस्कळीत

लोणावळा : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने रस्त्यावर गोल फि रत दुभाजकावरून विरुद्ध लेनवर गेल्याने झालेल्या अपघातानंतर सुमारे तीन तास मुंबईहून पुण्याकडे जाणारी, तसेच मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती़ शुक्रवारी दुपारी १२च्या सुमारास खंडाळा बाह्यवळणाजवळील तीव्र उतार व वळणावर झालेल्या या अपघातात कसलीही जीवितहानी झाली नाही़
खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेला ट्रक (केए २५ सी ८७३८) चालकाचे नियंत्रण सुटल्याने घसरला. विरुद्ध लेन म्हणजेच मुंबई-पुणे लेनवर गेला. या वेळी पुण्याच्या दिशेने येत असलेला ट्रक (टीएन ५२ एच ३३४६) व कार (एमएच १२ एक्यू ८६५७) यांना धडक बसली. गाडी दुभाजकामध्येच आडवी उभी राहिली़ त्यातच गाडीच्या इंजिनमधून मोठ्या प्रमाणात आॅईल रस्त्यावर सांडल्याने दोन्ही बाजूंकडील वाहतूक विस्कळीत झाली होती़
घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी गेलेले खंडाळा महामार्गचे सहायक पोलीस निरीक्षक कुलकर्णी, हवालदार वसंत कदम, सुधाकर शिंदे, पोलीस नाईक सय्यद पठाण व हेमंत विरोळे यांच्या पथकाने व आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त गाड्या बाजूला केल्यानंतर दुपारी तीनला वाहतूक पूर्वपदावर आली़
पर्यटनाचे मध्यवर्ती केंद्र लोणावळा शहरात उन्हाळी पर्यटनाचा शेवटचा वीकएण्ड साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आज दाखल झाल्याने राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती महामार्ग, तसेच लोणावळा शहरात मोठी वाहतूककोंडी झाली आहे़ (वार्ताहर)

Web Title: Traffic disrupted for three hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.