शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक उपायुक्त पुण्यासाठी तयार करणार स्वतंत्र ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 13:19 IST

शहराचे नवीन वाहतूक उपायुक्त पंकज देशमुख यांनी शहरातील वाहतूकीची परिस्थितीचा आढावा घेऊन एक स्वतंत्र ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

पुणे :  पुण्यातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटील हाेत चालली आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील रस्ते अरुंद पडत आहेत. त्यातच शहरात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने नागरिक खासगी वाहनांचा वापर करतात.  त्यामुळे शहराचे नवीन वाहतूक उपायुक्त पंकज देशमुख यांनी शहरातील वाहतूकीची परिस्थितीचा आढावा घेऊन एक स्वतंत्र ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यासाठी शहरातील सर्व वाहतूक विभागांना सूचित करण्यात आले असून आठवडाभरात हद्दीतील वाहतूक व्यवस्थेबाबत माहिती देण्याचे सांगण्यात आले आहे.

वाहनांची वाढलेली संख्या, अपुरे पडणारे रस्ते, त्याचबराेबर बेशिस्त वाहनचालक यामुळे शहरातील वाहतूक काेंडीत दिवसेंदिवस भर पडत आहे. पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालणेही कठीण झाले आहे. अशातच वाहतूक समस्यांवर एक दिर्घकाळ चालणारा उपाय शाेधून काढणे गरजेचे आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये वाहतूक उपायुक्तांची एक ते दीड वर्षांमध्ये बदली करण्यात आली आहे. पुण्याच्या आधीच्या वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते यांची तर केवळ सहा महिन्यात बदली करण्यात आली. साताऱ्यावरुन पुण्यात बदली हाेऊन आलेले नवनियुक्त वाहतूक उपायुक्त पंकज देशमुख यांनी पुण्याची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी स्वतंत्र ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन तयार करण्याचे ठरवले आहे. देशमुख यांनी शहरातील सर्व परिसराची माहिती मागवली आहे. या माहितीच्या आधारे कुठल्या परिसरात काय उपाययोजना करणे गरजेचे आहे? हे ठरवण्यात येणार आहे. रस्ते, पुटपाथ तसेच एमएसईबीचे खांब आदींबाबत उपाययोजनेसाठी महापालिका, एमएसईबी यांच्याशी संयुक्तरित्या काम केले जाणार आहे. पुढील आठ दिवसांत सर्व वाहतूक विभागातून ही माहिती येणे अपेक्षित असून यानंतर प्रत्यक्ष उपाययोजना करण्यात येणार आहेत. 

शहरातील ही माहिती घेणार- रस्ते, अतिक्रमण, पदपथांची अवस्था- प्रत्येक ठिकाणचे सिग्नल पाहणी- यु टर्न, वन वे, क्रॉस लाईन आदी- ठिकठिकाणी पीक अव्हर्स आणि इतर वेळेमधील वाहतूक परिस्थिीती

वाहतूकीबाबत शहरातील विविध भागाच्या सद्यस्थितीची माहिती घेण्यात येत आहे. यासाठी सर्व वाहतूक विभागांना सूचना देण्यात आल्या असून आठवडाभरात माहिती जमा केली जाईल. यानंतर पुढील उपाययोजना करण्यात येतील.- पंकज देशमुख, वाहतूक उपायुक्त, पुणे 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसPuneपुणे