शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पौष पौर्णिमा यात्रेच्या मुहूर्तावर जेजुरीत भरला आहे गाढवांचा पारंपरिक बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 11:56 IST

कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाची पौष पौर्णिमा यात्रा नववर्षाच्या मुहूर्तावर आजपासून (दि. १)  सुरु झाली आहे. या निमित्ताने दरवर्षी जेजुरीत गाढवांचा पारंपरिक बाजार भरतो.

ठळक मुद्देबाजारासाठी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने गाढवे जेजुरीत दाखल विविध समाजातील लोक गाढवांच्या खरेदी-विक्री व कुलदैवताच्या दर्शनासाठी येतात जेजुरीत

जेजुरी : कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाची पौष पौर्णिमा यात्रा नववर्षाच्या मुहूर्तावर आजपासून (दि. १)  सुरु झाली आहे. या निमित्ताने दरवर्षी जेजुरीत गाढवांचा पारंपरिक बाजार भरतो. या बाजारासाठी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने गाढवे जेजुरीत दाखल झाले आहेत.जेजुरीच्या बंगाली पटांगणात अनेक पिढ्यांपासून गाढवांचा बाजार भरतो. येथे जागा कमी पडत असल्याने पालखी तळावरही हा बाजार भरू लागला आहे. ज्या समाजाचा उदरनिर्वाह गाढवावर अवलंबून आहे, विविध समाजातील लोक गाढवांच्या खरेदी-विक्री व कुलदैवताच्या दर्शनासाठी दरवर्षी पौष पौर्णिमेला जेजुरीत येतात.समाजील अनेकांची उपजीविका गाढवांवर अवलबून आहे. डोंगर पठारावर जेथे रस्त्याची सोय नाही, तेथे दगड माती, वाळू, विटा तसेच विविध सामान वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर केला जातो. सध्याच्या यांत्रिक युगात गाढवाच्या पाठीवरचे ओझे कमी झाले आहे. यंत्रयुगात गाढवांची मागणी कमी झाली असली तरी यात्रेनिमित्त देवदर्शनासाठी येण्याची प्रथा आजवर टिकून आहे.दोन ते तीन दिवस चालणाºया गाढवांच्या बाजारासाठी गुजरातमधून सुमारे साडेतीनशे  काठेवाडी गाढवे विक्रीसाठी येथे आली आहेत. तसेच महाराष्ट्रच्या विविध भागातूनही मोठ्या संख्येने गाढवे दाखल झाली आहेत. गाढवांच्या खरेदी विक्रीला सुरवात झाली असून गाढवांची किंमत, त्यांची वये व दातावरून ठरत असते. दोन त तीन  हजारापासून ते तीस हजारापर्यंत गाढवांची विक्री होते. काठेवाडी गाढवांना चांगली किंमत मिळते.                                गाढवांच्या बाजारानंतर वैदू समाजाचा कुस्तीचा आखाडा येथे दरवर्षी भरतो. तसेच जेजुरीत वैदू व भातु कोल्हाटी समाजाची जातपंचायत पूर्वी भरत असत. या जात पंचायती प्रथा बंद झाल्या आहेत. 

टॅग्स :JejuriजेजुरीKhandoba Yatraखंडोबा यात्राPuneपुणे