Khandoba got yellowish, began to turmoil. Kartoba would be married to Khandoba-Mhalsaai | खंडोबा पिवळा झाला, हळद लागली... कोरठणला होणार खंडोबा-म्हाळसाईचे लग्न

कान्हूर पठार : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पारनेर तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील श्री कोरठण खंडोबाच्या पौष नवरात्रोत्सवाला रविवारी प्रारंभ झाला. पौष षष्टीला देवाला हळद लावण्यात आली असून, पौष पौर्णिमेला (३ जानेवारी) खंडोबाचे म्हाळसाबरोबर लग्न होणार आहे. २ ते ४ जानेवारीला वार्षिक यात्रौत्सव होत आहे.
दरवर्षी परंपरेने पंचक्रोशीतील व नगर जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या संख्येने हळद लावली. पिपळगावरोठा येथून हळकुंड व पूजेचे सामान घेऊन महिला गावातून वाजत गाजत आल्या. मंदिरात जात्यावर हळद दळून देवाचा महिमा, ओव्या म्हणन्यात आल्या. 

अत्यंत सुमधुर आवाजात भाजपा तालुकाध्यक्षा व विश्वस्त अश्विनीताई थोरात, मनिषा जगदाळे, शालिनी घुले, विद्या ठुबे, दिपाली झावरे, शैला झावरे, शीतल झावरे, वैशाली नरड, गंगुबाई नरड, कासारे सरपंच सिंधुबाई लगड, माजी सरपंच रोहिणी पानमंद, स्मिता घोडके, प्रतिभा घुले, अरुणा घुले, अंजना माने, सविता घुले, सिंधुबाई घुले, शीतल लोळगे, वृषाली लोळगे, गवूबाई वाफारे, लक्ष्मी जगताप, हिराबाई जगताप, शांताबाई घुले, बदाम जगताप या ग्रामस्थ महिलांबरोबर जि.प.सदस्य उज्वला ठुबे, गोरेगावच्या सरपंच सुमनताई तांबे, सुमन दाते यांसह शेकडो महिलांनी गाणे गात देवाला हळद लावली.