शिवाईदेवी यात्रेची परंपरा कोरोनाने दुसऱ्या वर्षी खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:09 AM2021-05-13T04:09:46+5:302021-05-13T04:09:46+5:30

अक्षय तृतीयेला शिवाईदेवी यात्रेनिम्मित जुन्नर शहरात विविध धार्मिक, सामाजिक, मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. ...

The tradition of Shivai Devi Yatra was broken by Corona in the second year | शिवाईदेवी यात्रेची परंपरा कोरोनाने दुसऱ्या वर्षी खंडित

शिवाईदेवी यात्रेची परंपरा कोरोनाने दुसऱ्या वर्षी खंडित

Next

अक्षय तृतीयेला शिवाईदेवी यात्रेनिम्मित जुन्नर शहरात विविध धार्मिक, सामाजिक, मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मागील वर्षी प्रथमच कोरोनाच्या संकटामुळे ही यात्रेची परंपरा खंडित करण्यात आली होती. यावर्षी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय यात्रा कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला. यात्रा कमिटीचे शाम खोत, चंद्रशेखर जोशी, बिहारी परदेशी, कैलास गोसावी, विक्रम कुऱ्हे, अ‍ॅड. वैभव परदेशी, श्रीधर कानिटकर, यशवंत मंचरकर, संजय ताजने, सोनू पुराणिक आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. प्रतिवर्षी गुढीपाडवा ते अक्षय तृतीया या कालावधीत जुन्नर तालुक्यातील गावांच्या यात्रा जत्रा साजऱ्या होतात. ह्या यात्रा हंगामात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. मागील वर्षी कोरोनामुळे सर्व यात्रा-जत्रा रद्द करण्यात आल्या होत्या. अक्षय तृतीयेला जुन्नर शहराची यात्रेने महिनाभर सुरू असलेला यात्रांचा हंगामाचा समारोप होत असतो. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी यात्रा हंगाम रद्द करावा लागला आहे. ____________________________

Web Title: The tradition of Shivai Devi Yatra was broken by Corona in the second year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.