लॉकडाऊनच्या विरोधात दौंडमध्ये व्यापाऱ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:11 IST2021-04-09T04:11:11+5:302021-04-09T04:11:11+5:30

दौंड शहर व तालुका मर्चंट आसोसिएशनचे अध्यक्ष राजेश पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र ओझा यांनी मोर्चाचे नेतृत्व ...

Traders march in a race against the lockdown | लॉकडाऊनच्या विरोधात दौंडमध्ये व्यापाऱ्यांचा मोर्चा

लॉकडाऊनच्या विरोधात दौंडमध्ये व्यापाऱ्यांचा मोर्चा

दौंड शहर व तालुका मर्चंट आसोसिएशनचे अध्यक्ष राजेश पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र ओझा यांनी मोर्चाचे नेतृत्व केले होते. सतीश नय्यर, शंकर दावरा, रवींद्र जाधव, धरम लुंड, प्रशांत कांबळे, चंद्रकांत चोभे, राजेंद्र मुथा, महेंद्र राठोड, योवी जोशी यांच्यासह व्यापारी या मोर्चात सहभागी झाले होते.

सध्या कोरोनाचे मोठे संकट आहे अशा परिस्थितीत व्यापारी शासनाला सहकार्य करण्यास तयार आहेत. मात्र व्यापारी दुकाने अचानक बंद करायला लावणे हा यावर मार्ग नाही. मुळातच गेल्या वर्षापासून व्यापारपेठ आर्थिक डबघाईस आली आहे. त्यातच सातत्याने बंद परवडणारे नाही. परिणामी व्यापारी आणि ग्राहक यात दरी निर्माण होत चालली आहेच मात्र सर्वच व्यापारी आर्थिक संकटात आहे. याचा विचार शासनाने करावा, असे तहसीलदार संजय पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

--

फोटो क्रमांक - ०८ दौंड मोर्चा

फोटो : दौंड शहरात व्यापाऱ्यांनी शासनाच्या निषेर्धात काढलेला मोर्चा.

Web Title: Traders march in a race against the lockdown