शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

बारामती शहराला २४ तास पाणीपुरवठा मिळणार; बृहत पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 19:56 IST

बृहत पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यास नगरपरिषदेची मंजुरी

बारामती : बारामती शहराला आता २४ तास पाणीपुरवठा मिळण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे.शुक्रवारी(दि २८)बारामती नगरपालिकेच्या ऑनलाईन झालेल्या सर्वसाधारण सभेत बारामतीच्या बृहत पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पासह शहराच्या दृष्टीने महत्वपुर्ण असणाऱ्या विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पांच्या उभारणीनंतर शहराचा चेहरामोहराच बदलणार आहे.

नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. सन २०५३ पर्यंत बारामतीची वाढणारी लोकसंख्या लक्षात घेवुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेनुसार ही योजना आखण्यात आली आहे. जवळपास १५५ कोटी रुपये या प्रकल्पासाठी खर्च होणार आहे. हा प्रकल्पा कार्यान्वित झाल्यानंतर बारामतीकरांना आठवड्याचे सात दिवस चोवीस तास पिण्याचे पाणी पुरविण्याचे नगरपालिकेचे नियोजन आहे. यात ७५ टक्के रक्कम राज्य शासन अनुदानाच्या रुपाने देणार आहे,तर  २५ टक्के रक्कम नगरपालिकेला भरायची आहे. शहराच्या दृ ष्टीने महत्वपुर्ण असणाºया प्रकल्पाला आज अखेर मंजुरी  नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली. 

विषय क्रमांक १८ वरील चचेर्नंतर विषय क्रमांक १९ ते विषय क्रमांक २९ पर्यंतचे विषय राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी चर्चेविनाच एकमुखी मंजूर करण्यात आले. त्यानंतरच्या विषयांवर कोणतीच चर्चा झाली नाही. नटराज नाट्य कला मंडळास जागा देण्याच्या विषयाला विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते यांनी विरोध दर्शविला. 

यावेळी पार पडलेल्या सभेत तांदुळवाडी हद्दीतील रेल्वे भुयारी मार्गालगतचे रस्ते करणे,इंदापूर चौकात शॉपिंग सेंटर बांधकामाच्या सुधारीत अंदाजपत्रकास मान्यता, वसंतराव पवार नाट्यगृह व कॉम्प्लेक्सच्या सुधारीत अंदाजपत्रकास मान्यता, सर्व्हे क्रमांक २२० मधील कॉम्प्लेक्सच्या सुधारीत अंदाजपत्रकास मान्यता, जळोची, तांदुळवाडी, रुई व बारामती ग्रामीण व मुळ हद्दीतील रस्त्याची कामे आदी विषयांना मंजुरी देण्यात आली.

टॅग्स :BaramatiबारामतीWaterपाणीAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार